लॉकडाऊन काळात दाखल झालेल्या गुन्ह्यात लाखोंचा दंड वसुल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:05 AM2021-02-06T04:05:31+5:302021-02-06T04:05:31+5:30
कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा वापर केला. मात्र तरीही नागरीक कोणत्या ना कोणत्या कारणाचा वापर करुन घराबाहेर ...
कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा वापर केला. मात्र तरीही नागरीक कोणत्या ना कोणत्या कारणाचा वापर करुन घराबाहेर पडतच होते. यावर उपाय म्हणुन कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात विनापरवानगी घराबाहेर पडणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, ठरवुन दिलेल्या वेळेपेक्षा जास्तवेळ दुकान चालु ठेवणे, परवानगी नसतांना कार-दुचाकीने प्रवास करणे, मास्कचा वावर अशा आरोपावरून पोलीसांनी गुन्हे दाखल केले. अर्थात ठोठावला दंड आरोपींनी भरला देखील. काही तुरळक गुन्ह्यात गुन्हा कबुल न केलेल्यांवरील खटले मात्र सुरु आहेत.
कन्नड तालुक्यात शहर, ग्रामीण, पिशोर व देवगाव असे चार पोलीस ठाणे आहेत. त्यातील कन्नड शहर व ग्रामीण पोलीस ठाणे मिळून लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या आरोपाखाली २६१ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात विनापरवानगी घराबाहेर पडणे (९), जास्तवेळ दुकान सुरु ठेवणे (९), दुकान बंद ठेवणे बंधनकारक असतांना उघडणे (४४), विनापरवानगी कार-दुचाकीने प्रवास करणे (४६), जमावबंदी आदेशाचे उल्लंघन (४), विनामास्क फिरणे (१४९) यांचा समावेश आहे. त्यापैकी ४५३ आरोपींकडून ५ लाख ४३ हजार ४०० रूपये दंड वसुल करण्यात आला.
----------
गुन्हे मागे घेण्याची अशी असेल रचना
शासन स्तरावरुन पोलीस अधिक्षक व आयुक्त कार्यालयाकडे गुन्हयाच्या संदर्भाने माहिती विचारली जाते. ठरवून दिलेल्या नियमावलीत बसणाऱ्या गुन्हयांची माहिती संकलित केली जाते. शासनस्तरावर निर्णय होऊन न्याय विभागामार्फत खटले मागे घेण्याची प्रक्रिया राबविली जाईल असे कन्नड शहर पोलीस ठाण्याचे रामेश्वर रेंगे यांनी सांगीतले.
---------------
लॉकडाऊन काळातील गुन्ह्यांची माहिती - पिशोर पोलीस ठाणे
विना परवानगी घराबाहेर पडणे : निरंक
जास्त वेळ दुकान चालू ठेवणे : ६/६ : ४५००
विनापरवानगी कार / दुचाकी प्रवास = २/२ : २५००
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन : २०/१२९ : १००० ( फक्त एका गुन्ह्यात शिक्षा 1/1000)
विना मास्क फिरणे : १०/१० : ७०००
दारू विकताना आणि बाळगताना मिळून आले : ४/४ =०
मास्क न लावता दुकानात मिळून आला : ३/३ : ६०००
तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना मिळून आला =५/५ : 1700 (४ गुन्ह्यात शिक्षा १७०० दंड )
आंबे विक्री करताना मिळून आला : 2/2 =०
उघड्यावर मांस विक्री करताना : ७/७ : ३७०० (५ गुण्यात शिक्षा ३७००)
विनापरवानगी गावाकडे आले : १/१ = ०
---------
पेढे विकताना मिळून आला = ६/६ : ४००० (४ गुन्ह्यात शिक्षा ४००० दंड )
टीप : ३४ गुन्ह्यात ३४ आरोपीना न्यायालयाने ३०,४०० दंड आकारला आहे. तर २२ गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत.