वाजपेयींच्या श्रद्धांजलीला नकार देणाऱ्या एमआयआम नगरसेवकास भाजप सदस्यांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:35 PM2018-08-17T13:35:13+5:302018-08-17T15:03:46+5:30
माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीस एमआयएम नगरसेवकाने विरोध दर्शवल्याने त्याला भाजपच्या सदस्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज दुपारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत घडली.
औरंगाबाद : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीस एमआयएम नगरसेवकाने विरोध दर्शवल्याने त्याला भाजपच्या सदस्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज दुपारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत घडली.
आज महानगरपालिकेची समांतर वाहिनीसंदर्भात विशेष सभा बोलाविण्यात अली होती. सभेच्या सुरुवातीला माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नगरसेवक मतीन यांनी सभागृहातून पळ काढला.
दरम्यान, महापालिकेच्या आवारात भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडले. भाजप संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख यांची चारचाकी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे.
कडक कारवाईची मागणी
एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांच्यावर कडक कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा व त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे केली आहे.
सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव
मारहाणीच्या घटनेनंतर विशेष सभेत मतीन यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करावे, तसेच त्यांचावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा ठराव घेण्यात आला.
पाहा व्हिडिओ -