एमआयएम नगरसेवकांनी तोडला कर्मचाऱ्याचा पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:42 PM2018-11-03T22:42:45+5:302018-11-03T22:43:23+5:30
बारी कॉलनी भागात अनधिकृत नळ घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए.एस. मोरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोबाईलद्वारे अनधिकृत नळ घेत असल्याचे फोटो मोबाईलवर काढण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरातील एमआयएम नगरसेवकांनी मोरे यांना चक्क बेदम मारहाण करून त्यांचा पायच फ्रॅक्चर केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
औरंगाबाद : बारी कॉलनी भागात अनधिकृत नळ घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए.एस. मोरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोबाईलद्वारे अनधिकृत नळ घेत असल्याचे फोटो मोबाईलवर काढण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरातील एमआयएम नगरसेवकांनी मोरे यांना चक्क बेदम मारहाण करून त्यांचा पायच फ्रॅक्चर केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे महापालिकेतील कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
माजी सनदी अधिकारी रत्नाकर गायकवाड यांचे जावई असलेले ए.एस. मोरे अत्यंत शांत आणि मृदू स्वभावाचे आहेत. बारी कॉलनी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ घेण्यात येत असल्याची माहिती गुरुवारी दुपारी त्यांना मिळाली. कामात अत्यंत प्रामाणिक असलेले मोरे एकटेच घटनास्थळी पोहोचले. आपल्या मोबाईल कॅमेºयात फोटो काढण्यास त्यांनी सुरुवात केली. अचानक एमआयएम नगरसेवकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून अक्षरश: फोडून टाकला. कार्यकर्त्यांनी पाठीमागून त्यांच्यावर काठीने हल्ला चढविला. हा हल्ला वाचविण्याचा मोरे यांनी बराच प्रयत्न केला. त्यांचा पाय फ्रॅक्चर होईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. बेशुद्धावस्थेत त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोरे आज शुद्धीवर आले. त्यांनी अद्याप पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही. तक्रार देऊ नये म्हणून एमआयएम नगरसेवकांकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. दुचाकीवरून पडल्याने जखमी झालो, पाय मोडला असे पोलिसांना, महापालिका अधिकाºयांना सांगा, असा दबाव टाकण्यात येत आहे. दरम्यान, कामगार नेते कृष्णा बनकर यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वीच एन-५ पाण्याच्या टाकीवर चार कर्मचाºयांना बेदम मारहाण करण्यात आली. आता शाखा अभियंत्याला टार्गेट करण्यात आले. सोमवारी महापालिका कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याचे बनकर यांनी नमूद केले. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी शाखा अभियंत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.