इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणाचं केलं स्वागत; ऑफरही दिली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:33 AM2022-06-09T08:33:09+5:302022-06-09T08:33:47+5:30
एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं स्वागत केलं आहे.
औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपासह औरंगाबाद शहरातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. पाणीप्रश्नाला मी सामोर जातोय, कुठेही फसवेगिरी नाही. मी प्रामाणिक आहे. पूर्वी दहा दिवसांपूर्वी पाणी यायचं आता हे दिवस कमी कमी होत चालले आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
सभेला येताना प्रशासकीय अधिकारी भेटले. झारीतले शुक्राचार्य त्यांना बाहेर फेका आणि माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या असं अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. पाणी योजनेसाठी मी पैसे देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या वतीने देणार आहे. योजनेसाठी पैसे कमी पडून देणार नाही. परंतु योजनेला विलंब झाला तर दया, माया न दाखवता कंत्राटदाराला तुरुंगात टाका असा आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपाने ही टोमणे सभा असल्याचे सांगत निशाणा साधला आहे. मात्र एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं स्वागत केलं आहे.
इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्यांवर जोर दिल्याचं म्हटलं आहे. तसचे उद्धव ठाकरे यांनी चांगले मुद्दे मांडले. त्यांचं स्वागत आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच 'राज्यसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत महविकास आघाडी, भाजपा किंवा अन्य कुणीही संपर्क केला नाही. तुम्ही आले, संपर्क केला तर आम्ही विचार करू पण, मतदान करतांना आमच्या अटी आहेत' अशी ऑफरही इम्तियाज जलील यांनी यावेळी दिली.
हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे #UddhavThackerayhttps://t.co/pre7NaO3rbpic.twitter.com/M7PE1YeIqf
— Lokmat (@lokmat) June 8, 2022
दरम्यान, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, काश्मीर पंडितांची रक्षण करणारी शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे म्हणून ही जनता माझ्यावर प्रेम करतेय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. बाबरी मशीदीचं आंदोलन करताना जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा नारा होता. बाबरी पाडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तुम्ही संसदेत कायदा केला नाही. तुमचं हिंदुत्वासाठी कर्तृत्व काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला-
आज सगळंकाही ठीक असताना भाजपा कुणालातरी सुपारी देते, हनुमान चालीसा पुढे आणते, भोंगा आणतं, थडग्यावर नतमस्तक व्हायला लावतं. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा, हा देश माझा धर्म म्हणून घराबाहेर पाऊल टाकायचं. जर कुणी धर्माचं वेड घेऊन आम्ही देशाभिमानी हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष आम्ही करत नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.