‘मिनी घाटी’च्या यंत्रसामुग्रीची प्रक्रिया अद्याप राज्यस्तरावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 07:14 PM2018-02-27T19:14:36+5:302018-02-27T19:19:10+5:30
दोन वर्षांपासून रखडलेले चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ७ मार्चपर्यंत पूर्णक्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात आवश्यक यंत्रसामुग्रींची अजूनही प्रतीक्षाच आहे.
औरंगाबाद : दोन वर्षांपासून रखडलेले चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ७ मार्चपर्यंत पूर्णक्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात आवश्यक यंत्रसामुग्रींची अजूनही प्रतीक्षाच आहे. यंत्रसामुग्रीची राज्यस्तरावर अद्यापही प्रक्रिया सुरू असल्याचेच सांगितले जात आहे.
रुग्णालयाच्या यंत्रसामुग्रीसाठी सुमारे ११ कोटींचा प्रस्ताव असून, गतवर्षी यंत्रसामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये विविध ५१ प्रकारच्या यंत्रसामुग्रीसाठी मान्यता देण्यात आली आहे; परंतु आतापर्यंत केवळ एक्स-रे मशीन प्राप्त झाले आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत ६० लाखांचे उपचार साहित्य खरेदी करण्यात आले, तर नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी घेण्यात आलेल्या ५० खाटा जिल्हा सामान्य रुग्णालयास मिळाल्या आहेत.
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सामान्य रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी लक्ष घातले. ७ मार्चपर्यंत हे रुग्णालय सुरू करण्याची सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना केली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी यास दुजोरा देत महिनाभरात यंत्रसामुग्री मिळेल,असे जानेवारीत सांगितले होते;