राज्यमंत्री- पोलीस कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:02 AM2021-03-22T04:02:06+5:302021-03-22T04:02:06+5:30
विभागीय सहनिबंधक कार्यालयातील दोन मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजेपासून मतदान सुरू झाले. मतदान केंद्रावर तैनात असलेले क्रांती चौक ...
विभागीय सहनिबंधक कार्यालयातील दोन मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजेपासून मतदान सुरू झाले.
मतदान केंद्रावर तैनात असलेले क्रांती चौक पोलीस ठाण्याचे हवालदार संजय भोकरे यांनी मतदान केंद्रावर दोन तासांपासून बसलेल्या अब्दुल सत्तार व आमदार सतीश चव्हाण यांना केंद्राबाहेर जाण्याची विनंती केली. त्यावर सत्तार यांचा पारा चढला व ‘तू आम्हाला सांगणारा कोण’ असे म्हणत तू विरोधकांची पैसे खाल्ले आहेत, असा आरोप केला. त्यावर संतप्त झालेल्या पोलिसानेही ‘मी पैसे खाल्ले असेल तर तपासणी करा’ असे थेट उत्तर दिले. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.
हे प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत गेल्यानंतर मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.