राज्यमंत्र्यास शिवीगाळ करणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:06 AM2021-02-16T04:06:11+5:302021-02-16T04:06:11+5:30
सिल्लोड : भाजपतर्फे सिल्लोडमध्ये करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा काहीएक संबंध नसताना सूडबुद्धीने त्यांची ...
सिल्लोड : भाजपतर्फे सिल्लोडमध्ये करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा काहीएक संबंध नसताना सूडबुद्धीने त्यांची बदनामी करण्यात आली. भाजपचे शहर अध्यक्ष कमलेश कटारिया यांनी अर्वाच्च शिवीगाळ करून सत्तारांची मानहानी केली. या प्रकरणी भाजपच्या शहराध्यक्ष व सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणारे दोनजण मिळून तिघांविरोधात सिल्लोड ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. कमलेश कटारीया, अमोल ढाकरे, महेश शंकरपल्ली अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेतर्फे रविवारी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
------------------
आंदोलनानंतर गुन्हा दाखल
सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी त्यांच्या प्लॉटवर बांधकाम केले होते. या प्रकरणी त्यांना विना परवाना बांधकाम सुरू केल्याने ते पाडावे, अशी नोटीस नगरपरिषदेने दिली होती; पण त्यांनी संबंधित बांधकाम न पाडल्याने नगरपरिषदेने शुक्रवारी ते बांधकाम पाडले. त्यामुळे हा वाद विकोपाला गेला. याप्रकरणी भाजपतर्फे शनिवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.