चिमुकलीने चिठ्ठीद्वारे आईकडे मांडली व्यथा; लेकीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला जामीन नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 07:29 PM2021-08-14T19:29:32+5:302021-08-14T19:33:21+5:30
Man sexually abuse his own girl : फारकतीनंतर आरोपीने कधी महिन्यानंतर तर कधी दोन महिन्यांनंतर मुलीला आईसोबत भेटू दिले. त्यामुळे त्या दोघींमधील संवाद बंद होता.
औरंगाबाद : स्वत:च्या ११ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ३९ वर्षाच्या नराधम बापाने सादर केलेला नियमित जामीन अर्ज विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी नामंज़ूर केला. ( There is no bail for the person who sexually abuse his own girl)
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार १८ मे २००९ रोजी त्यांचे आरोपीसोबत लग्न झाले होते. त्यांच्यात वाद वाढल्याने फिर्यादी २०१२ पासून मुलीसह आईवडिलांच्या घरी राहत होती. २०१५ मध्ये महिलेने फारकत घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. २३ जुलै २०२१ रोजी दोघांची फारकत झाली. तत्पूर्वी मुलीचा ताबा मिळावा यासाठी आरोपीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपीला १२ एप्रिल २०१९ रोजी मुलीचा ताबा मिळाल्यानंतर ती बापासोबत राहत होती. न्यायालयाने आठवड्यातून शनिवार आणि रविवार फिर्यादी व मुलीला भेटू द्यावे असे आदेशामध्ये नमूद केले होते. मात्र, आरोपीने कधी महिन्यानंतर तर कधी दोन महिन्यांनंतर मुलीला आईसोबत भेटू दिले. त्यामुळे त्या दोघींमधील संवाद बंद होता.
‘काळा चबुतरा’ पूर्वी केवळ नाव घेताच ‘मृत्यूचे’ भय वाटत असलेली जागा आज बनले ‘प्रेरणास्थळ’
आई शाळेत गेली अन् घटनेला वाचा फुटली
फेब्रुवारी २०२१ मध्ये मुलगी शिक्षण घेत असलेल्या शाळेत आई भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी मुलीने लिहिलेल्या चिठ्ठ्या आईला दिल्या, असे आईने तक्रारीत म्हटले आहे. ‘मला तुझ्याकडे घेऊन जा’ अशी विनवणी केली. आईने चिठ्ठ्या वाचल्या असता आरोपीने स्वत:च्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे बिंग फुटले. न ऐकल्यास बाप तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेदेखील मुलीने चिठ्ठीत म्हटले होते. मुलीने दिलेल्या जबाबातदेखील वरीलप्रमाणेच घटना नमूद केली असल्याचे रिमांड यादीत म्हटले आहे. यासंदर्भात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने जामीन नाकारला
गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक जे. डाके यांनी आरोपीला ३ ऑगस्ट रोजी अटक केली होती. न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी त्याला विरोध केला. उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला.
पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत गोपीनाथ गडावरून भागवत कराडांची यात्रा