अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By Admin | Published: September 10, 2016 12:14 AM2016-09-10T00:14:07+5:302016-09-10T00:24:19+5:30
वाळूज महानगर : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
वाळूज महानगर : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. नितीन आडे (२५, रा. वाळूज), असे आरोपीचे नाव आहे.
कपड्याच्या दुकानात सेल्स गर्ल म्हणून काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी तिची मैत्रीण ५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता पैठणगेट येथे आली होती. तुला भेटण्यासाठी माझ्यासोबत दोन मित्र आले असल्याचे तिने मैत्रिणीला सांगितले. उशीर झाल्याने आपण भेटू शकत नसल्याचे मुलीने सांगितल्यानंतर मैत्रिणीने नितीनशी त्याचे मोबाईलवर संभाषण करून दिले. ‘मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे,’असे सांगून नितीनने तिला भेटण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर नितीन, त्याचा मित्र अमोल पोपळघट, मैत्रीण व अल्पवयीन मुलीला हे कारमधून (एमएच-०४ एवाय ७५१८) नगररोडवरील बंद पडलेल्या पेट्रोलपंपाजवळ नेण्यात आले. तेथे नितीनने कारमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी शहरात येत असताना नितीनच्या कारला मिलकॉर्नरजवळ अपघात झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना छावणी ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलीकडे विचारणा केल्यास आपले बिंग फुटेल, या भीतीने नितीनने तिला लग्नाचे आमिष दाखवून गप्प बसण्यास सांगितले; परंतु नितीन लग्न करीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिने अखेर पोलिसांत तक्रार दिली. दुय्यम निरीक्षक ए. डी. जहारवाल तपास करीत आहेत.