लिपिकाच्या त्रासाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 03:52 PM2019-02-05T15:52:53+5:302019-02-05T15:59:01+5:30

तालुक्यातील उंडनगाव येथील एका अल्पवयीन मुलीने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली.

minor girls suicide due to clerks harassment in Undangaon | लिपिकाच्या त्रासाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

लिपिकाच्या त्रासाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

googlenewsNext

सिल्लोड (औरंगाबाद ) : तालुक्यातील उंडनगाव येथील एका अल्पवयीन मुलीने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. सिल्लोड येथील एका खाजगी शाळेत क्लर्क असलेल्या संजय घुगरे याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने अजिंठा पोलीस स्थानकात केली आहे. 

प्रणाली कृष्णा जाधव (१७ ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पालोद येथील महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत होती. या प्रकरणी अजिंठा पोलीस स्थानकात दाखल तक्रारी नुसार, संजय घूगरे ( रा. घटांब्री ) हा सिल्लोड येथील रामकृष्ण विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. तो दररोज बसने येणेजाणे करतो. प्रणालीसुद्धा उंडनगाव येथून शिक्षणानिमित्त पालोद येथे बसने येणेजाणे करत असे. या दरम्यान, संजय तिची बसच्या प्रवासात रोज छेड काढत असे. मी म्हणेल तसे वाग नसता माझ्याकडे तुझे फोटो आणि व्हिडीओ आहे ते सोशल मीडियात व्हायरल करेल, तुझी आणि तुझ्या कुटुंबाची बदनामी करेल अशी धमकी देत असे. या रोजच्या त्रासाला प्रणाली कंटाळली होती. तिने याबाबत तिच्या पालकांना सांगितले असता त्यांनी संजयला समजावले होते. मात्र त्याने छेडछाड बंद केली नाही. यामुळे प्रणालीने आत्महत्या केल्याची तक्रार कृष्णा जाधव यांनी पोलिसात केली आहे. 

शाळेच्या निरोप संमारंभात दिली धमकी 
सोमवारी प्रणालीचा पालोद येथील महाविद्यालयात निरोप समारंभ होता. यावेळी संजय घुगरे या कार्यक्रमात आला. त्याने प्रणालीला परत बदनामीची धमकी दिली. यानंतर घरी येताच सायंकाळी प्रणालीने आत्महत्या केली. 

आरोपीला घेतले ताब्यात 
प्रणालीच्या आत्महत्येनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र आरोपी संजय घुगरे यास ताब्यात घेतल्या शिवाय प्रेत ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यामुळे येथे काही काळ तणाव होता. पोलिसांनी घुगरेला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 
 

Web Title: minor girls suicide due to clerks harassment in Undangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.