'लिव्हइन'मध्ये अल्पवयीन झाली 'माता'; सज्ञान झाल्यानंतर लग्नास नकार दिल्याने मुलाविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 07:28 PM2021-10-19T19:28:59+5:302021-10-19T19:33:18+5:30

कायदेशीर अडचण असल्याने तरूणाने मधला मार्ग काढत १८ वर्ष पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू असे आश्वासन

a minor in ‘Live in’ became ‘Mother’; Crime against a child for refusing to marry after becoming adult | 'लिव्हइन'मध्ये अल्पवयीन झाली 'माता'; सज्ञान झाल्यानंतर लग्नास नकार दिल्याने मुलाविरोधात गुन्हा

'लिव्हइन'मध्ये अल्पवयीन झाली 'माता'; सज्ञान झाल्यानंतर लग्नास नकार दिल्याने मुलाविरोधात गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देसुखीसंसाराची स्वप्न दाखवून अल्पवयीन मुलीसोबत थाटला संसार

पैठण ( औरंगाबाद ) : वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करू असे आश्वासन देऊन तो तीला घरी घेऊन आला. आनंदाने संसार सुरू केला या दरम्यान त्यांना कन्यारत्नही झाले. बघता बघता ती आता १९ वर्षाची झाली, तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने चालढकल केली, मारहाण  करून लग्नास नकार दिला. लग्नासाठी सर्व प्रयत्न करूनही यश न आल्याने शेवटी तिने पैठण पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली आहे. 

शहरातील तरूणाचे पैठण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध निर्माण झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. मुलगी अल्पवयीन असल्याने त्यांना लग्न करण्यात कायदेशीर अडचण येत होती. तरूणाने मधला मार्ग शोधला. १८ वर्ष पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू असे आश्वासन देत मुलीला पैठण शहरातील घरी घेऊन आला. दोन वर्षांपासून दोघेही लग्न न करताच संसाराला लागले. दरम्यान त्यांना मुलगी झाली, तिनेही वयाची १८ वर्षे पूर्ण केली. या नंतर मुलीने त्याच्याकडे लग्न करण्याचा हट्ट धरला. प्रत्येक वेळी तो टाळाटाळ करू लागला. लग्नासाठी सारखा पिच्छा पुरविल्याने रागावून तिला मारहाण केली. 

ज्याने सुखी संसाराचे स्वप्न दाखवले त्याच्या मनात काय आहे हे लक्षात येताच तिने शेवटी पैठण पोलीस ठाण्यात धाव घेऊन कैफियत मांडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांना कल्पना दिली. सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी तिची फिर्याद घेतली. पोलीसांनी  त्याच्यावर   कलम 376 (2), (जे ), (एन ),  376 (3), 323 504 भादवि सह कलम 4, 6 पोस्को आदी गंभीर कलमाखाली पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी किशोर पवार, सपोनी जनाबाई सांगळे हे करीत आहेत.

Web Title: a minor in ‘Live in’ became ‘Mother’; Crime against a child for refusing to marry after becoming adult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.