औरंगाबादच्या घाटीतून औषधी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:40 AM2018-05-12T00:40:04+5:302018-05-12T00:40:20+5:30
गरिबांची घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून औषधी गायब झाल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना रोज बसू लागला. घात-अपघात असो किंवा प्रसूतीसाठी दाखल होणाºया रुग्णांना घाटीत दाखल होताच त्यांना औषधांची चिठ्ठी दिली जाते. महागडी औषधी खरेदी करून आणल्यानंतरच रुग्णांवर घाटीत उपचार सुरू होतात, या धक्कादायक प्रकारामुळे सामान्य रुग्ण मेटाकुटीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गरिबांची घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून औषधी गायब झाल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना रोज बसू लागला. घात-अपघात असो किंवा प्रसूतीसाठी दाखल होणाºया रुग्णांना घाटीत दाखल होताच त्यांना औषधांची चिठ्ठी दिली जाते. महागडी औषधी खरेदी करून आणल्यानंतरच रुग्णांवर घाटीत उपचार सुरू होतात, या धक्कादायक प्रकारामुळे सामान्य रुग्ण मेटाकुटीस आले.
मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून घाटीची ओळख आहे. येथील निष्णात डॉक्टरांमुळे सामान्य मराठवाडा आणि शेजारील रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून घाटीत दाखल होणाºया रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून घाटीतील जीवनावश्यक औषधी गायब झाली. घात-अपघातात जखमी झालेला रुग्ण दाखल होताच, बॅण्डेज, आय.व्ही. सलाईनसह अन्य औषधी तातडीने आणण्याचे डॉक्टरांकडून सांगितले जाते.
जोपर्यंत रुग्णांकडून औषधी आणि डिस्पोजल साहित्य आणले जात नाही, तोपर्यंत डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होत नाही. असाच अनुभव प्रसूती विभागात प्रसूतीसाठी दाखल होणाºया गोरगरीब महिलांनाही येतो.
प्रसूतीसाठी दाखल होणाºया महिलांच्या नातेवाईकांकडे तेथील डॉक्टर आणि नर्सेसकडून औषधांची चिठ्ठी सोपविली जाते. प्रसूती किट घेऊन या, असा सल्ला त्यांना दिला जातो. असाच अनुभव खुलताबाद येथील एका महिलेच्या नातेवाईकांना शुक्रवारी आला.
घाटीतील आंतररुग्ण विभागात
दाखल होतात रोज २०० रुग्ण
घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज सुमारे १ हजार ७०० ते २ हजार रुग्ण येतात. यापैकी सरासरी २०० रुग्णांना आंतररुग्ण विभागात पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. त्याचप्रमाणे दररोज लहान-मोठ्या अशा सुमारे १०० शस्त्रक्रिया केल्या जातात. घाटीत रोज सरासरी ५० ते ६० महिलांची प्रसूती होते. यातील दहा ते पंधरा सिझेरियन असतात.
औषधी आणा, नाही तर रुग्णाला घेऊन जा
खुलताबादेत झोपडी करून राहणाºया दशरथ गणपत सोनवणे यांनी त्यांच्या सुनेला प्रसूती विभागात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या हातात औषधाची चिठ्ठी सोपवली.
तेव्हा सोनवणे यांनी त्यांना तुमच्याकडे औषधी नाही का, असे विचारले असता. ते स्पष्ट शब्दांत नाही असे म्हणाले आणि आधी औषधी आणा, नाही तर तुमचा पेशंट घेऊन जा, असेही सुनावले.
त्यानंतर सोनवणे आणि त्यांच्यासोबतच्या देवीसिंग चित्तोडिया यांनी मेडिकल स्टोअरमधून ५९० रुपयांची औषधी आणि डिस्पोजल साहित्य प्रसूती विभागात नेऊन दिल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाची लिफ्ट बंद
घाटी रुग्णालयातील अपघात विभाग आणि सर्जरी विभागाच्या इमारतीत तीन लिफ्ट आहेत. यापैकी वॉर्ड क्रमांक १५ जवळील लिफ्ट रात्री सुरू ठेवली जाते. तिसºया मजल्यावरील प्रसूती विभागात जाण्यासाठी जेव्हा गर्भवती महिला दाखल होतात तेव्हा त्यांना वॉर्ड क्रमांक १५ पर्यंत पायी जावे लागते. बºयाचदा लिफ्टपर्यंत पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती होते. ही बाब प्रशासनाला ज्ञात असूनही अपघात विभागाजवळील लिफ्ट सुरू केली जात नाही.