मयताचे पैसे सेवानिवृत्तास !
By Admin | Published: November 25, 2014 12:24 AM2014-11-25T00:24:39+5:302014-11-25T00:58:48+5:30
बीड : रजा असतानाही कर्तव्य बजावणाऱ्यास निवृत्तीनंतर रोखीकरणाच्या स्वरूपात वेतनानुसार रक्कम दिली जाते़ एका कर्मचाऱ्याचे अशाच प्रकारचे रोखीकरणाचे पैसे
बीड : रजा असतानाही कर्तव्य बजावणाऱ्यास निवृत्तीनंतर रोखीकरणाच्या स्वरूपात वेतनानुसार रक्कम दिली जाते़ एका कर्मचाऱ्याचे अशाच प्रकारचे रोखीकरणाचे पैसे निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांना मिळण्याऐवजी दुसऱ्याच एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा झाले़ जि़ प़ च्या आरोग्य विभागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़
जि़ प़ आरोग्य विभागात पी़ एऩ अंदूरकर हे कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते़ १४ सप्टेंबर २०१४ रोजी ते सेवानिवृत्त होणार होते़ मात्र दुर्दैवाने २३ डिसेंबर २०१३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले़ त्यांच्या निधनानंतर ग्रॅच्युएटी तसेच निवृत्ती वेतनाचा लाभ त्यांच्या पत्नीला मिळाला़ मात्र रजेच्या काळात काम केल्याबद्दलचे २ लाख ५९ हजार ३७८ रूपये येणे बाकी होते़
दुसरीकडे याच कार्यालयात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत असलेले बी़ एस़ देशमुख हे ३१ जुलै २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले़ त्यानंतर १७ आॅक्टोबर २०१४ रोजी शासनाकडून एकाच वेळी ३८ कर्मचाऱ्यांचे अर्जित रजा व इतर सेवेचे पैसे आरोग्य विभागाकडे आले़ धनादेश क्रमांक ९८८९२६ नुसार एकाच वेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात आला़ यात मयत अंदूरकर यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम निवृत्त कर्मचारी देशमुख यांच्या खात्यावर जमा झाली़ खात्यावर जमा झालेला निधी जीपीएफचा समजून देशमुख यांनी तो उचलला़ इकडे अंदूरकर यांचे नातेवाईक आरोग्य विभागात अर्जित रजेच्या पैशासाठी खेटे घालून थकले़ त्यांनी केलेल्या चौकशीनंतर अंदूरकरासाठी आलेला निधी देशमुखांच्या खात्यात गेल्याचे समोर आले़ हा पैसा चुकून देशमुख यांच्या खात्यात गेल्याचे सांगितले जात आहे़ मात्र माझ्या वडिलांनी रजा न घेता कर्तव्य बजवलेले आहे़ त्यांच्या घामाचा दाम त्यांच्याच वारसाना मिळायला हवा, अशी मागणी अंदूरकर यांचे पुत्र पी़ पी़ अंदूरकर यांनी केली आहे़ दरम्यान, देशमुख यांनी पैसे परत करण्याची भूमिका घेत माणुसकीचे दर्शन घडविले आहे़ (प्रतिनिधी)
आरोग्य विभागातील वरिष्ठ सहायक एल़ जी़ रामदासी यांनी ही बिले तयार केली होती़
४त्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़
४शिवाय निवृत्त कर्मचारी देशमुख यांना देखील १ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून खात्यात जमा झालेले अंदूरकर यांचे पैसे आरोग्य विभागाला परत करण्याचे कळविले आहे़
असे व्हायला नको होते
४जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे म्हणाले, आमच्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना त्रास व्हायला नको होता़
४मात्र, संबंधितांकडून पैसे परत घेऊन अंदूरकर कुटुंबियांना देण्यात येतील़
४रामदासी यांनी तांत्रिक चूक असल्याचा दावा ‘लोकमत’शी बोलताना केला़