बजाजनगरातून चिमुकल्यासह महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:32+5:302021-09-03T04:04:32+5:30
फोटो क्रमांक- रोहिणी बदाणे (बेपत्ता) फोटो क्रमांक- रुद्र बदाणे (बेपत्ता) -------------------------- वाळूजला गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे कार्यशाळा वाळूज महानगर : ...
फोटो क्रमांक- रोहिणी बदाणे (बेपत्ता)
फोटो क्रमांक- रुद्र बदाणे (बेपत्ता)
--------------------------
वाळूजला गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे कार्यशाळा
वाळूज महानगर : वाळूज येथे गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत राजा रवी वर्मा महाविद्यालयाचे प्राचार्य उदय भोईर, प्रशिक्षक ज्ञानेश्वर आसोलेकर यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत परिसरातील १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेला गरवारे कम्युनिटी सेंटरचे केंद्र प्रमुख मिथिन चव्हाण, भूषण कोथालकर, वर्षा ढेपे, आशा गोरडे, वसंत वाणी आदींची उपस्थिती होती.
------------------------------
शिट शेपर्स कंपनीत रक्तदान शिबिर
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील शिट शेपर्स कंपनीत आयोजित रक्तदान शिबिरात कामगार व कंपनीतील अधिकारी व कर्मचारी आदी मिळून ७२ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन अशोक मंडलेचा, रजनिश कटारिया, आशिष कटारिया, राणा महाराका, मनीष कटारिया, रिना कटारिया, मनीष दोशी, दर्शन मंडलेचा, डॉ. सुभाष पाटोदी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. रक्त संकलनाचे कार्य औरंगाबाद ब्लड बँकेचे शामराव सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
--------------------------------
वाळूजला पोषण आहार महोत्सव
वाळूज महानगर : वाळूज येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने पोषण आहार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी सरपंच रंजना भोंड, ग्रामपंचायत सदस्या विमलबाई चापे, अंगणवाडी पर्यवेक्षिका चित्रा खोचे आदींची उपस्थिती होती. यावेळी पोषण आहाराविषयी अंगणवाडी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला छाया घोडके, सविता धावडे, संगीता चितारे, मीना सोनवणे, सुनीता भालेकर आदींची उपस्थिती होती.
--------------------------------