वाळूज येथुन महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:03 AM2021-02-26T04:03:21+5:302021-02-26T04:03:21+5:30

बजाजनगरात दोन झाडे तोडली वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासन व वन विभागाची परवानगी न घेता दोन झाडे तोडल्याची घटना ...

Missing woman from Waluj | वाळूज येथुन महिला बेपत्ता

वाळूज येथुन महिला बेपत्ता

googlenewsNext

बजाजनगरात दोन झाडे तोडली

वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासन व वन विभागाची परवानगी न घेता दोन झाडे तोडल्याची घटना बुधवारी (दि. २४) बजाजनगरात घडली. कोलगेट चौकालगत असलेल्या आरएल १०७ या सोसायटीतील नागरिकांनी झाडे तोडल्याने पर्यावरण प्रेमींनी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळताच सहायक अभियंता बी. एस. दीपके यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

-------------------------

मृत तरुणाची ओळख पटेना

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत बेशुद्ध होऊन मरण पावलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. औद्योगिक क्षेत्रातील मराठवाडा आटो कंपनीजवळ २३ फेब्रुवारीला एक ओनळखी तरुण बेशुध्द अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता. या अनोळखी तरुणास पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले होते. या अनोळखी तरुणाचे वय जवळपास ३० वर्ष असून, त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर बजरंगबलीचे चित्र गोंदलेले आहे. या अनोळखी तरुणाविषयी माहिती असल्यास एमआयडीसी, वाळूज पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------

सलामपुरेनगरात साफसफाई होइना

वाळूज महानगर : पंढरपुरातील सलामपुरेनगरात साफसफाई होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. या कामगार वसाहतीत ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे स्वच्छता करीत नसल्याने ठिक-ठिकाणी केर-कचरा साचला आहे. या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, नागरिकांना नाक दाबूनच ये-जा करावी लागत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

----------------------

पंढरपुरात रिक्षा रस्त्यावर

वाळूज महानगर : पंढरपुरात रिक्षा रस्त्यावरच उभ्या राहात असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. येथील जामा मशिदीसमोरील रिक्षा थांब्यावर रिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करीत असल्याने ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी रिक्षात बसविण्यासाठी रिक्षाचालक प्रवाशासोबत झोंबाझोंबी करीत असल्याच्या घटनाही सतत घडत आहेत. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रिक्षाचालकाविरुध्द कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून केली जात आहे.

---------------------

मनाली रेसिडेन्सी रोडवर पथदिवे बंद

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील मनाली रेसिडेन्सी या रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. पथदिवे बंद असल्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी चोरटे नागरिकांना रस्त्यात अडवून लुटत असल्याच्या घटनाही अधून-मधून घडत असतात. पथदिवे सुरु करण्याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकात असंतोषाचे वातावरण आहे.

------------------------

बजाजनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

वाळूज महानगर : बजाजनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असल्याने नागरिकांत भीतीचे वातवरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हे मोकाट कुत्रे धावून जात असतात. याच बरोबर दुचाकीस्वारांचा पाठलागही कुत्रे करीत असल्याने नागरिक व दुचाकीस्वारात भीतीचे वातावरण पसरले आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे.

---------------------

Web Title: Missing woman from Waluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.