मिशन ॲडमिशन : बी.ई., बी.टेक. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

By योगेश पायघन | Published: September 24, 2022 08:02 PM2022-09-24T20:02:20+5:302022-09-24T20:02:41+5:30

अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण पदवी प्रवेशासाठी करा ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज

Mission Admission : B.E., B.Tech. Online registration for admission has started | मिशन ॲडमिशन : बी.ई., बी.टेक. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

मिशन ॲडमिशन : बी.ई., बी.टेक. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

googlenewsNext

औरंगाबाद : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बी.ई., बी.टेक. या चार वर्षांच्या आणि मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नाॅलाॅजी या इंटिग्रेटेड पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीला बुधवारपासून सुरुवात झाली. ४ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणीस वेळ देण्यात आली आहे.

सीईटी सेलच्या संकेतस्थळावर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण पदवी अभ्यासक्रमानुसार, फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक, सूचना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चितीसाठीसंदर्भात सूचना काळजीपूर्वक वाचून विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. दुसऱ्या फेरीसाठी २२ ऑक्टोबरपासून, तर तिसऱ्या फेरीसाठी १ नोव्हेंबरपासून प्रवेश सुरू होतील. त्याच दिवशीपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल. जागा रिक्त राहिल्या, तर त्यांच्यासाठी १० ते १७ नोव्हेंबरची मुदत आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत तीन प्रवेश फेरीसह समुपदेशन फेरी प्रवेशासाठी घेतली जाणार आहे.

...असे असेल वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे : ४ ऑक्टोबर दुपारी ४ वाजेपर्यंत
कागदपत्रे पडताळणी अर्ज निश्चिती : ४ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत
तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी : ७ ऑक्टोबर
आक्षेप नोंदवणे : ८ ते १० ऑक्टोबर
अंतिम गुणवत्ता यादी, जागावाटप : १२ ऑक्टोबर
पहिल्या प्रवेश फेरीसाठी पर्याय भरणे : १३ ते १५ ऑक्टोबर जागावाटप : १८ ऑक्टोबर जागावाटप स्वीकृती : १९ ते २१ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत
महाविद्यालयात प्रवेश निश्चिती - १९ ते २१ ऑक्टोबर दुपारी ५ वाजेपर्यंत

 

Web Title: Mission Admission : B.E., B.Tech. Online registration for admission has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.