चूक एकाची नोटीस मात्र भलत्यालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 09:31 PM2018-11-13T21:31:22+5:302018-11-13T21:31:38+5:30

औरंगाबाद : वाहतूक पोलीस आणि सेफ सिटी प्रकल्पात दररोज नवीन गमतीजमती घडत आहेत. हेल्मेट न घातल्याने मोटारसायकलस्वाराचा फोटो काढून घेतला अन् नोटीस मात्र दुसऱ्याच व्यक्तीला पाठविल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे.

mistake one but notice issue another | चूक एकाची नोटीस मात्र भलत्यालाच

चूक एकाची नोटीस मात्र भलत्यालाच

googlenewsNext

वाहतूक शाखा: सेफ सिटी प्रकल्पाचा प्रताप
औरंगाबाद : वाहतूक पोलीस आणि सेफ सिटी प्रकल्पात दररोज नवीन गमतीजमती घडत आहेत. हेल्मेट न घातल्याने मोटारसायकलस्वाराचा फोटो काढून घेतला अन् नोटीस मात्र दुसऱ्याच व्यक्तीला पाठविल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे.


सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील महत्त्वाच्या चौकात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाई तसेच दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे; परंतु वाहतुकीचे उल्लंघन करणाºयांचे फोटो मोबाईलमध्ये घेऊन दुचाकीस्वाराला नोटीस पाठविण्याचे काम सेफ सिटी प्रकल्पांतर्गत केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या गाडी नंबरवरून मिळालेल्या अनेक वाहनचालकांची माहिती सहज उपलब्ध होत आहे. अनेकदा दुचाकीस्वार रस्त्यावरून सुसाट निघून जातात त्यांचे छायाचित्र आणि नोटीस घरपोहोच येत आहे. हजारो नोटीस पत्त्याअभावी पडून असून, ज्या नोटीस पोहोचल्या आहेत, त्यातही काही चुका राहत आहेत. त्याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत.


गेल्या महिन्यात २२ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजून २१ मिनिटाला (एमएच १९ बी.ए. ३४७०) च्या क्रमांकाच्या मोटारसायकलस्वारास विना हेल्मेटचा फोटो कॅमेºयात कैद झाला असून, त्याची कॉपी सेफ सिटी प्रकल्पातून काढून नोटीस त्या चालकाला देण्याऐवजी ती नोटीस (एमएच-२०-बीए-३४७०) च्या मोटारसायकलस्वारास देण्यात आली. तसेच त्याने १४ दिवसांत ५०० रुपयांचा दंड भरावा अन्यथा न्यायालयात केस चालविण्यात येईल, असे नमूद केले आहे; परंतु त्याने हा दंड कसा भरावा, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Web Title: mistake one but notice issue another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.