टेक्नोलॉजीचा दुरुपयोग ! दुसऱ्याच्या नावे कॉंस्टेबल पदाची ऑनलाईन परिक्षा देणारा तोतया पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:18 PM2020-11-28T18:18:01+5:302020-11-28T18:20:38+5:30

परीक्षा सुरू झाल्यावर तो कानाला हात लावून हळू आवाजात कुणासोबत तरी बोलत असल्याचे परिक्षा केंद्रातील आयटी मॅनेजरला दिसले.

Misuse of technology! An online examinee for the post of Delhi Police constable was caught in the name of another | टेक्नोलॉजीचा दुरुपयोग ! दुसऱ्याच्या नावे कॉंस्टेबल पदाची ऑनलाईन परिक्षा देणारा तोतया पकडला

टेक्नोलॉजीचा दुरुपयोग ! दुसऱ्याच्या नावे कॉंस्टेबल पदाची ऑनलाईन परिक्षा देणारा तोतया पकडला

googlenewsNext
ठळक मुद्देहॉलतिकिटावरील छायाचित्र त्याच्याशी जुळत नव्हतेबनियनच्या खिशात ट्रान्समीटर, ब्ल्यू ट्रूथ असे डिव्हाइस सापडले

औरंगाबाद: दिल्ली पोलीस दलाच्या कॉंस्टेबल पदाची दुसऱ्या उमेदवाराच्या नावे परिक्षा देणाऱ्या तोतयाला एमआयडीसी सिडको पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. टेक्नोलॉजीचा दुरुपयोग करत ऑनलाईन परीक्षेत बनवेगिरी करणाऱ्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला. अर्जुन बाबुराव बिघोत असे आरोपीचे नाव आहे.

दिल्ली पोलीस दलातील रिक्त पदासाठी २७ नोव्हेंबर रोजी देशभर ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. चिकलठाणा एमआयडीसीतील आयऑन डिजिटल झोन येथे अमोल गडवे (रा. केळगांव, ता. औरंगाबाद) या उमेदवाराची परिक्षा होती. ग्राउंड फ्लोअरवरील हॉलमध्ये अमोलच्या नावाने अर्जुनने परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळविला. परीक्षा सुरू झाल्यावर तो कानाला हात लावून हळू आवाजात कुणासोबत तरी बोलत असल्याचे परिक्षा केंद्रातील आयटी मॅनेजर प्रशांत महाकाळ यांना दिसले. त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याचे हॉल तिकिट तपासले असता ते अमोल गडवेचे असल्याचे दिसले. 

आरोपी स्वतःचे नाव अमोल गडवे असे सांगत होता. मात्र हॉलतिकिटावरील छायाचित्र त्याच्याशी जूळत नसल्याने त्यांचा संशय बळवला. यानंतर केंद्र व्यवस्थापक मनोज प्रभाकर अंबाडे यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांना पाहुन त्याला घाम फुटला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या दोन्ही कानात मायक्रो मक्खी एअर फोन होते. तर बनियनच्या खिशात ट्रान्समीटर , एटीएम कार्ड, ब्ल्यू ट्रूथ असे डिव्हाइस लपविलेले दिसले. परिक्षेत कॉपी करण्यासाठी त्याने हे साहित्य सोबत आणल्याचे समोर आले. तो एअर फोन आणि ट्रान्समीटरच्या माध्यमातून परिक्षा केंद्राबाहेर बसलेल्या व्यक्तीला प्रश्न पत्रिकेतील प्रश्न सांगून त्यांच्याकडून अचूक उत्तरे मिळवून परिक्षा देत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या तोतयागिरीचा भंडाफोड झाल्यावर मनोज अंबाडे यांची आरोपीविरुध्द एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरिक्षक संजय मांटे तपास करीत आहेत.

दोन दिवस पोलीस कोठडी
आरोपी अर्जुन बिघोत याने मित्राच्या नावे परिक्षा देत असल्याचे सांगितले असले तरी त्याने एक लाख रुपये घेऊन परिक्षा देण्यासाठी तो उपस्थित होता असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले.

Web Title: Misuse of technology! An online examinee for the post of Delhi Police constable was caught in the name of another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.