वाळूज महानगरात बंदला संमिश्र प्रतिसाद
By | Published: December 9, 2020 04:00 AM2020-12-09T04:00:26+5:302020-12-09T04:00:26+5:30
वाळूज महानगर: केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाळूज महानगरात मंगळवार (दि.८) आयोजित बंदला संमिश्र प्रतिसाद ...
वाळूज महानगर: केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाळूज महानगरात मंगळवार (दि.८) आयोजित बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी बाजारपेठेतील काही दुकाने बंद होती. दुपारनंतर बाजारपेठ सुरळीत झाली. या बंदमध्ये भाजप वगळता इतर राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवित हा कायदा रद्द करण्याची मागणी केली.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आदी प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला. वंचित व विविध पक्षाच्या वतीने तिसगाव चौफुलीवर निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात केंद्र शासनाच्या विरोधात हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याऐवजी केंद्र सरकार बड्या कंपन्यांच्या दावणीला शेतकरी बांधत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या आंदोलनात अंजन साळवे, राणुजी जाधव, विलास पठारे,कमलसिंग सूर्यवंशी, संजय दाभाडे, सोमनाथ महापुरे, किशोर साळे, विठ्ठल चोपडे, अक्कलचनद कसुरे आदींनी सहभाग नोंदविला होता. वाळूजला भाजप वगळता इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, नंदकुमार राऊत, बाळासाहेब चनघटे, राष्ट्रवादीचे सिध्देश्वर ढोले, राऊफ पठाण, अमजदखॉ पठाण, काँग्रेसचे नदीम झुंबरवाला, शरदचंद्र अभंग, संदीप साळवे, संजय शिंदे, अनिल भुजंग, एमआयएमचे संतोष दळवी, प्रवीण अग्रवाल आदींनी सहभाग नोंदविला होता. परिसरातील पंढरपूर, रांजणगाव, जोगेश्वरी आदी ठिकाणी बंदला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.
बाजारपेठेत दुपारनंतर गर्दी
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वाळूज महानगरात सकाळपासून बहुतांश सर्व बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला. बजाजनगर, पंढरपूर परिसरातील दुकाने नेहमीप्रमाणे सुरु होती. दुपारी ४ वाजेनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. बंदमुळे औरंगाबाद-नगर महामार्गावरील वाहनांच्या संख्याही रोडावल्याचे दिसून आले. उद्योगनगरीतील कारखाने सुरु असल्यामुळे या बंदचा औद्योगिक क्षेत्रात फारसा परिणाम जाणवला नाही. या बंद दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाळूज व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
फोटो ओळ-तिसगाव चौफुलीवर केंद्र शासनाच्या कृषी कायद्याचा निषेध करताना आंदोलनकर्ते .
फोटो क्रमांक-चौफुली
फोटो ओळ- वाळूज येथे बंदचे आवाहन करताना राजकीय पक्षाचे पदाधिकारी दिसत आहेत.
फोटो क्रमांक- वाळूज १/२