अंधारी शाळेत मियावाकी घनवन प्रकल्प
By | Published: December 2, 2020 04:09 AM2020-12-02T04:09:33+5:302020-12-02T04:09:33+5:30
या प्रकल्पात दोनशे चौरस फूट जागेत स्थानिक देशी प्रजातींची अधिकाधिक ॲक्सिजन देणारी औषधी तसेच फळे देणारी सहाशे झाडे लावण्यात ...
या प्रकल्पात दोनशे चौरस फूट जागेत स्थानिक देशी प्रजातींची अधिकाधिक ॲक्सिजन देणारी औषधी तसेच फळे देणारी सहाशे झाडे लावण्यात आली. यात बेल, कडूलिंब, शिरस, मोहावा, आवळा, कदंब, कळंब, शतावरी, शिसम, पिंपळ, आंबा, बेहडा, अर्जुन, बिबा, जांभूळ, हिरडा, खैर, आपटा, पळस, कांचन, तुळस, सीताफळ, उंबर या जातीच्या झाडांचा समावेश आहे. या झाडांमुळे तीन वर्षात घनवन तयार होणार आहे. ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण, औषधी वनस्पतींची तसेच झाडांच्या प्रजाती यांची माहिती प्रत्यक्ष शाळेतच मिळणार आहे. त्याचबरोबर फुलपाखरे, पक्षी, कीटक यांना आधिवास तयार होणार आहे. यावेळी मुख्याध्यापक एकनाथ जाधव, आकाश पोतेवार, सचिन भुसारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धृपत तायडे, रईस शेख, विजय आढाव, भाऊसाहेब गोराडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
---- कॅप्शन : अंधारीच्या जिल्हा परिषेदच्या शाळेत मियावाकी घनवन प्रकल्पांतंर्गत वृक्षारोपण करताना नागरिक.