मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर आमदार चव्हाण गटाचे वर्चस्व 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:52 PM2018-06-04T12:52:48+5:302018-06-04T12:55:47+5:30

मराठवाड्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या (मशिप्रमं) केंद्रीय कार्यकारिणीची निवडणूक आज सकाळी १० वाजता पार पडली.

MLA Chavan group dominated by Marathwada Education Prasarak Mandal election | मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर आमदार चव्हाण गटाचे वर्चस्व 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर आमदार चव्हाण गटाचे वर्चस्व 

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या (मशिप्रमं) केंद्रीय कार्यकारिणीची निवडणूक आज सकाळी १० वाजता पार पडली. यात मंडळाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळुंके उपाध्यक्षपदी अमरसिंह पंडितव शेख सलीम आणि सचिव पदासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. 

देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात झालेल्या या निवडणुकीकडे मराठवाड्यातील शिक्षणासह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजीमंत्री प्रकाश सोळुंके यांना २७७ मते पडली तर त्यांच्या विरोधात लव पानसंबळ यांना ५२  मते पडली. यानंतर झालेल्या निवडीत उपाध्यक्षपदी  अमरसिंह पंडित (२७९ मते) व शेख सलीम यांना २७७ मते तर संस्थेच्या सचिव पदासाठी सतीश चव्हाण यांनी २८० मते घेऊन विजय मिळवला. यासोबतच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर आमदार चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. अन्य निकालात सहसचिव पदी प्रभाकर पालोदकर (२७९ मते ) व  अनिल नखाते यांना ( २७८ मते ) तर कोषाध्यक्ष पदासाठी अविनाश येळीकर (२७९  मते) यांनी विजय मिळवला.

उत्कंठावर्धक ठरली निवडणूक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर अनेक वर्षांपासून तत्कालीन सरचिटणीस मधुकरअण्णा मुळे यांची सत्ता होती. मात्र, मागील पंचवार्षिक निवडणुकीत १० जुलै २०१३ रोजी सत्तापालट झाला. आमदार सतीश चव्हाण यांच्या गटाने सत्ता काबीज केली. या गटात मराठवाड्यातील प्रस्थापित राजकीय कुटुंबाचा समावेश आहे. यात माजी मंत्री प्रकाश सोळंके, आमदार अमरसिंह पंडित, अभिजित आवरगावकर, रमेश आडसकर, विश्वास पाटील, हेमंतराव जामकर, अनिलराव नखाते, सलीम शेख, पंडितराव हर्षे आदींचा समावेश आहे. या पाच वर्षांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मधुकरअण्णा मुळे यांनी मागील निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, आ. चव्हाण गटाच्या बाजूने निकाल लागला. 

यानंतर चव्हाण गटाने संस्थेच्या सदस्यांमध्ये तब्बल १८२ नवीन सदस्यांचा समावेश केला आहे. यामुळे ‘मशिप्रमं’च्या सर्वसाधण सदस्यांची संख्या ३४३ वर पोहोचली आहे. निवडणूक जाहीर होईपर्यंत याचा विरोधी गटाला थांगपत्ताही लागला नाही. जेव्हा निवडणुकीचा कार्यक्रम हाती आला तेव्हा ज्येष्ठ सदस्य पद्माकरराव मुळे, मानसिंग पवार यांनी नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये, यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली. मात्र, त्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळाला नाही. यातच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी सुट्यांमुळे वेळ कमी पडला. यामुळे आजच्या निवडणुकीत जुन्या सदस्यांसह नवीन सदस्य मतदानात भाग घेतला. 

Web Title: MLA Chavan group dominated by Marathwada Education Prasarak Mandal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.