आमदारांच्या निधीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:04 AM2021-04-25T04:04:26+5:302021-04-25T04:04:26+5:30
औरंगाबाद : लाडगाव, मनुर, शिवुर, बोरसर, सिद्धनाथ वाडगाव या वैजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नव्या रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता ...
औरंगाबाद : लाडगाव, मनुर, शिवुर, बोरसर, सिद्धनाथ वाडगाव या वैजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नव्या रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. आ. रमेश बोरणारे यांच्या निधीतून प्रत्येकी ११.३५ लाख रुपयांच्या अशा एकूण ५६.७५ लाख रुपयांच्या रुग्णवाहिकांची खरेदी केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली.
यापूर्वी आ. बोरणारे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून बिलोली आणि गाढे पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही निधी देऊ केला असून, त्यांना अगोदरच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, तसेच कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत यांनीही नागद, बनोटी यांच्यासह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका खरेदीसाठी निधी दिला आहे. वैजापूरच्या ७ तर कन्नडच्या ३ अशा एकूण १० रुग्णवाहिकांची खरेदी एकाच वेळी केली जाणार आहे. या रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत मदत होईल, असे डॉ. शेळके म्हणाले.