टेंडरवरून संजय शिरसाटांनी बिल्डरला धमकावले; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप
By संतोष हिरेमठ | Published: September 28, 2022 03:51 PM2022-09-28T15:51:27+5:302022-09-28T15:51:27+5:30
या टेंडर प्रक्रियेत यात टेंडर काॅल करण्याआधीच आ. संजय शिरसाट यांनी विकासकाला धमकी दिली.
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांसाठीच्या क्वार्टर्स ४७ कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत टेंडर भरू नये, असे म्हणत आ. संजय शिरसाट यांनी आणि त्यांच्या पीएने एका विकासकाला धमकावल्याचा खळबळजनक आरोप ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी पत्रकार केला.
या टेंडर प्रक्रियेत यात टेंडर काॅल करण्याआधीच आ. संजय शिरसाट यांनी विकासकाला धमकी दिली. ही धमकी रॅकाॅर्ड झाली. त्यानंतर टेंडरचे सबमिशन झाले.मुंबई उच्च न्यायालयात आ. शिरसाट यांची तक्रार करण्यात आली आहे. याचिका मागे घेण्यासाठी आ. संजय सिरसाट आणि त्यांच्या पीएने धमकावल्याची माहिती ॲड. सदावर्ते यांनी दिली.
टेंडर प्रोसेस सुरु होण्यापूर्वीच धमक्यांना सुरुवात झाली होती. बोगस कागदपत्रे असल्याचे दाखविण्यात आले. याचिका दाखल करण्यात आली. वर्क ऑर्डर देण्याआधीही पुन्हा धमकी देण्यात आली. त्यानंतर माझे पक्षकार बाबा कन्स्ट्रक्शन यांनी रजिस्टर जनरलकडे या सगळ्यासंदर्भात अर्ज केला, असे सदावर्ते ॲड. यांनी सांगितले.