मनपाचा ७७७ कोटींचा ‘स्मार्ट’ अर्थसंकल्प

By Admin | Published: March 17, 2016 12:21 AM2016-03-17T00:21:27+5:302016-03-17T00:22:32+5:30

औरंगाबाद : महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी नगरसेवकांना केंद्रबिंदू मानून तयार करण्यात येतो.

MNP's 'Smart Budget' of 777 crores | मनपाचा ७७७ कोटींचा ‘स्मार्ट’ अर्थसंकल्प

मनपाचा ७७७ कोटींचा ‘स्मार्ट’ अर्थसंकल्प

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी नगरसेवकांना केंद्रबिंदू मानून तयार करण्यात येतो. दरवर्षीच्या परंपरेला छेद देऊन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी स्थायी समितीला २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी बुधवारी तब्बल ७७७ कोटी ३४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला असून, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करण्यासाठी हा अर्थसंकल्प चालना देणारा ठरणार असल्याची अपेक्षा आहे.
मागील वर्षी सर्वसाधारण सभेने सर्वाधिक ९७१ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाला सादर केला होता. मात्र, या फुगीर अर्थसंकल्पाला प्रशासनाने हातच लावला नाही. यंदा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प तयार करण्यावर लेखा विभागाने अधिक भर दिला होता. मनपा आयुक्त बकोरिया यांनी अर्थसंकल्प सादर करताना एक ‘आयडियल’ निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली आहे. शहरातील ११३ वॉर्डांना अंतर्गत कामांसाठी सुमारे ४० ते ५० लाख रुपये सरासरी मिळावेत, अशी तरतूद केली आहे. स्पिल ओव्हरमधील १०२ कोटी रुपयांची कामे यंदा अर्थसंकल्पात घेण्यात आली आहेत. महापालिकेच्या तिजोरीत जास्तीत जास्त निधी कसा येईल आणि शहरात विकासकामे कशी होतील, यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. (शासन अनुदान आणि एलबीटी/पान २ वर)
मागील वर्षभरात शहरातील विविध वॉर्डांमध्ये प्रत्येकी १५ लाख रुपयांचीही कामे झाली नाहीत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले होते. प्रत्येक वॉर्डाला न्याय मिळावा यादृष्टीने अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, साफसफाई आदी कामे करण्यात येतील.
मनपाचा अर्थसंकल्प तयार करताना शहरातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर होते. मनपाची आर्थिक बाजू कशी मजबूत होईल हे लक्षात घेऊन मालमत्ता कर व इतर आर्थिक स्रोतांवर अधिक लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, मनपा
स्मार्ट सिटीसाठी अनेक उपक्रम
नोव्हेंबर २०१६ मध्ये स्मार्ट सिटी योजनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यासाठी पुन्हा एकदा मनपाने कंबर कसली आहे. स्मार्टमध्ये दाखल होण्यासाठी मनपाने अर्थसंकल्पात होमवर्क केला आहे. पूरनियंत्रण डीपीआर तयार करण्यासाठी १ कोटी १ लाख, स्वतंत्र अभिलेखे कक्षासाठी १० लाख, सायन्स पार्कसाठी २५ लाख, ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी १ कोटी, अत्याधुनिक वाहन खरेदी, पथदिवे, आदर्श रस्ते, दुभाजक सौंदर्यीकरण, रस्त्यांतील विजेचे खांब हटविणे, शहरातील प्रवेशद्वारांच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी, सिडकोतील हरितपट्टे विकसित करण्यासाठी १ कोटी, वाहतूक सिग्नलसाठी १ कोटी, वृक्षारोपण ५० लाख, मनपा शाळेतील मुलांना मोफत लोहयुक्त औषधी देणे, सोलार सिटी उभारणे, सॅनेटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी १५ लाख.
मनपातर्फे सॅनेटरी नॅपकीन वाटप
मनपा शाळेतील मुलींना सॅनेटरी नॅपकीन पुरविण्याचा उपक्रमही यंदा अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. महिला व बालकांसाठी खास वाचनालय, महिलांसाठी स्वतंत्र सांस्कृतिक सभागृह, मनपाचे वॉर्ड कार्यालये, मुख्यालय, शहरातील विविध महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, विमानतळावर सॅनेटरी नॅपकीनचे मशीन लावण्यात येतील. नोकरदार महिलांसाठी वसतिगृह. या सर्व कामांसाठी ५ कोटींची तरतूद केली आहे.

Web Title: MNP's 'Smart Budget' of 777 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.