Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी मिळाली; पोलिसांनी घातल्या १६ अटी, काय म्हटलं पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 08:40 PM2022-04-28T20:40:02+5:302022-04-28T21:05:36+5:30
पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.
औरंगाबाद- मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. आज सायंकाळी पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटलं आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केलीय आणि पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केलाय. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट घालण्यात आली आहे. सभेदरम्यान, वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणाही करणार नाही याची आयोजन आणि वक्त्यांनी दक्षता घ्यावी, असही अटीमध्ये म्हटलं आहे. पण राज ठाकरे ही नोटीस स्वीकारणार का आणि त्यातल्या अटी मान्य करणार का याबाबत आता उत्सुकता आहे.
औरंगाबाद- मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. आज सायंकाळी पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिली. pic.twitter.com/TpSGMZGCG4
— Lokmat (@lokmat) April 28, 2022
राज ठाकरेंच्या सभेला थेट अयोध्येतून हिंदुत्ववादी संघटनांचे अडीच हजार कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेसाठी येणार आहे. अयोध्येतील हिंदुत्वावादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे. या संघटनांचे जवळपास अडीच हजार कार्यकर्ते औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. सभेची पूर्णपणे तयारी आम्ही करणार आहोत. स्टेजचं काम दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.
Raj Thackeray: राज ठाकरे योगी आदित्यनाथांची भेट घेण्याची शक्यता; अयोध्या दौऱ्यात करेक्ट टाइमिंग साधणार https://t.co/boegDg5Qpe@mnsadhikrut
— Lokmat (@lokmat) April 28, 2022
राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात आज बैठक
औरंगाबाद शहरातील कलश मंगल कार्यालयात आज मनसे नेत्यांची एक महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीला मनसेचे जवळपास ४०० पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. राज ठाकरेंच्या सभे संदर्भातील नियोजन या बैठकीत केलं जाणार आहे.