मनसेचा महावितरणला दणका

By | Published: November 26, 2020 04:13 AM2020-11-26T04:13:47+5:302020-11-26T04:13:47+5:30

मनसेचा महावितरणला दणका; मुख्य अभियंत्यावर भिरकावली बिले वाढीव वीज बिल : जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा औरंगाबाद : महावितरणने लॉकडाऊनमध्ये ...

MNS hits MSEDCL | मनसेचा महावितरणला दणका

मनसेचा महावितरणला दणका

googlenewsNext

मनसेचा महावितरणला दणका; मुख्य अभियंत्यावर भिरकावली बिले

वाढीव वीज बिल : जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा

औरंगाबाद : महावितरणने लॉकडाऊनमध्ये अनेकांना वाढीव वीज बिले दिली आहेत. त्या बिलांबाबत कंपनी काही निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्यावर बिले फाडून फेकत संताप व्यक्त केला.

राज्य सरकार वीज बिलावर कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपालांना यासंदर्भातील निवेदन दिले; परंतु तरीही सरकार याबाबत जनतेला दिलासा मिळावा, असा कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. जनता वाढीव वीज बिल आल्याने त्रस्त झाली आहे.

राज ठाकरे यांनी यासंदर्भात राज्य सरकारला सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिला होता; परंतु सरकारने आजही कोणताही निर्णय यावर घेतला नसल्याने मनसेने आक्रमक होत मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्याकडे जाब विचाराला.

जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी जनतेला आलेली वीज बिले अभियंत्यांसमोर फाडत त्यांच्या दिशेने भिरकावली.

शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, राजू खरे, नामदेव बेंद्रे, संदीप कुलकर्णी यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते.

२६ रोजी धडक मोर्चा

मनसे जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढणार आहे. या मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दाशरथे व शहराध्यक्ष गुलाटी यांनी केले आहे.

Web Title: MNS hits MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.