एसएमआर स्वीमिंग पूलला मनसेने ठोकले टाळे

By Admin | Published: March 18, 2016 01:26 AM2016-03-18T01:26:10+5:302016-03-18T01:55:29+5:30

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असताना बांधकामे, वॉशिंग सेंटर, वॉटर प्लँट, स्विमींग पूल चालूच आहेत़ स्विमींग पूलमधून हजारो लिटर पाणी दररोज वाया घालविले

The MNS stopped the SMR swimming pool | एसएमआर स्वीमिंग पूलला मनसेने ठोकले टाळे

एसएमआर स्वीमिंग पूलला मनसेने ठोकले टाळे

googlenewsNext


लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असताना बांधकामे, वॉशिंग सेंटर, वॉटर प्लँट, स्विमींग पूल चालूच आहेत़ स्विमींग पूलमधून हजारो लिटर पाणी दररोज वाया घालविले जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी सकाळी लातूर शहरातील एसएमआर स्विमींग पूलला टाळे ठोकले़
लातूर शहरात कधी नव्हे एवढी पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ मनपा प्रशासन नियोजनाअभावी शहरातील नागरिकांस पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे़ डोंगरगाव, भंडारवाडी, उजनीहून लातूरला पाणी आणू अशा केवळ घोषणाच नेतेमंडळी व प्रशासनाकडून होत आहेत़ प्रत्यक्षात मात्र यापैकी कोठूनही लातूरला पाणी मिळाले नाही़ दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर शहरात मात्र वॉशींग सेंटर, बांधकामे, वॉटर प्लँट, स्विमींग पूल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत़ परंतू या आदेशाचे उल्लंघन करून राजरोसपणे एसएमआर स्विमींग पूल चालू आहे़ त्यामुळे मनसेच्या वतीने गुरुवारी सकाळी टाळे ठोकले.
आंदोलनात संतोष नागरगोजे, राज क्षिरसागर, भारत बिराजदार, अ‍ॅड़चापोलीकर, भागवत शिंदे, नितीन ढमाले, किसन कदम, मनोज अभंगे, अजय कलशेट्टी, माधव कलमुखले, युवराज कांबळे, बजरंग ठाकूर, रणवीर उमाटे, बालाजी पाटील, बाळू डोंगरे, सतीश कदम, किरण चव्हाण आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)

Web Title: The MNS stopped the SMR swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.