सोयगावला जनावरांसाठी फिरता दवाखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:04 AM2021-07-26T04:04:27+5:302021-07-26T04:04:27+5:30

सोयगाव : जिल्ह्यात जनावरांच्या उपचारासाठी आता टोल फ्री क्रमांकावर घरपोच रुग्णवाहिका पशुपालकांच्या दारात उभी राहणार आहे. या योजनेमुळे पशुपालकांना ...

Mobile Animal Hospital at Soyagaon | सोयगावला जनावरांसाठी फिरता दवाखाना

सोयगावला जनावरांसाठी फिरता दवाखाना

googlenewsNext

सोयगाव : जिल्ह्यात जनावरांच्या उपचारासाठी आता टोल फ्री क्रमांकावर घरपोच रुग्णवाहिका पशुपालकांच्या दारात उभी राहणार आहे. या योजनेमुळे पशुपालकांना दिलासा मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाने मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत महापशुधन संजीवनी योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचा समावेश केला आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्याला आता १,९६२ या टोल फ्री क्रमांकावर घरपोच जनावरांच्या उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३१ जिल्ह्यातील ७३ तालुक्यांमध्ये ही योजना सुरू केली असून त्यात सोयगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. गाय, म्हैस, शेली, मेंढ्या आणि कुक्कुट आदींचे लसीकरणही या रुग्णवाहिकेतून होणार आहे. सोयगावातील पशुपालकांनी जनावरांच्या आजारासंबंधी सदर क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

250721\img-20210723-wa0254.jpg

सोयगाव-,फिरती रुग्णवाहिका

Web Title: Mobile Animal Hospital at Soyagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.