मोबाइलमुळे नाही उडाली चिऊताई भुर्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:02 AM2021-03-20T04:02:06+5:302021-03-20T04:02:06+5:30

चिमणी हा मनुष्य वस्तीच्या आधारानेच राहणारा पक्षी आहे. चिमणीचे घरटे झाडांपेक्षा जास्त भिंतींवर, कौलांवर, छतावर, असे मानवी घराच्या आडोश्याच्या ...

Mobile did not fly Chiutai Bhurr ... | मोबाइलमुळे नाही उडाली चिऊताई भुर्र...

मोबाइलमुळे नाही उडाली चिऊताई भुर्र...

googlenewsNext

चिमणी हा मनुष्य वस्तीच्या आधारानेच राहणारा पक्षी आहे. चिमणीचे घरटे झाडांपेक्षा जास्त भिंतींवर, कौलांवर, छतावर, असे मानवी घराच्या आडोश्याच्या ठिकाणी जास्त आढळून येते. आता सगळीकडे सिमेंटची घरे होत असल्याने माती, कौलं नाहीसे होत असल्याने चिमण्यांची घरटी नष्ट होत चालली असल्याने त्या शहरापासून दूर जात आहेत, हे चिमण्यांची संख्या कमी होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे, असे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स या संस्थेच्या २०२० सालच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

चौकट :

मोबाइलच्या उंच टॉवरवरच काही पक्ष्यांनी घरटी बांधलेली दिसतात. त्यामुळे मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे चिमण्यांची संख्या घटते आहे, असे नाही. चिमण्या कमी झाल्या, याचे मुख्य कारण म्हणजे सिमेंट काँक्रीटचे वाढलेले जंगल. यामुळे चिमण्यांना घरटे बांधायला सुरक्षित जागा राहिलेली नाही. तसेच गवत, झुडपं नष्ट होत चालल्याने किडे, दाणे हे अन्नही चिमण्यांना शहरात योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे चिमण्यांची संख्या शहरातून कमी होत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत ६० ते ७० टक्क्यांनी चिमण्यांची संख्या घटली आहे.

- डॉ. किशोर पाठक

पक्षीतज्ञ

Web Title: Mobile did not fly Chiutai Bhurr ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.