जिल्हा रुग्णालयात मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:05 AM2021-05-22T04:05:37+5:302021-05-22T04:05:37+5:30
दिवसाकाठी दोन हजार स्वॅब तपासणीची क्षमता : राज्यातील दुसरी लॅब, तिसऱ्या लाटेसाठी सज्ज औरंगाबाद : कोरोना विषाणूचे निदान करणारी ...
दिवसाकाठी दोन हजार स्वॅब तपासणीची क्षमता : राज्यातील दुसरी लॅब, तिसऱ्या लाटेसाठी सज्ज
औरंगाबाद : कोरोना विषाणूचे निदान करणारी आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मोबाईल टेस्टिंग व्हॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन हजार तपासणीची क्षमता असलेल्या या व्हॅनचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. पद्मा बकाल, डाॅ. भारती नागरे, लॅबच्या नोडल ऑफिसर डाॅ. अर्चना त्रिभुवन, डाॅ. मनोहर वाकळे, डाॅ. सविता सोनवणे, स्माईस हेल्थचे संचालक कर्नल कपिल नेहरा, मुख्य औषध निर्माण अधिकारी गुणवंत भारुळे यांच्यासह परिचारिकांची उपस्थिती होती.
मोबाईल आरटीपीसीआर लॅबही कंटेनरमध्ये अद्ययावत पद्धतीने तयार करण्यात आली असून, राज्यातील ही दुसरी लॅब आहे. यापूर्वी नागपूर येथे अशा पद्धतीची लॅब कार्यान्वित झाली. यात दिवसाकाठी दोन हजार तपासणी करण्याची क्षमता असून, सुरुवातीला ग्रामीण व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे त्यानंतर इतर ठिकाणचे स्वॅब या प्रयोगशाळेत तपासण्यात येतील, असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.