डीपी,कॉल,हार्ट एमोजीचा अर्थ काय?; नवरा-बायकोमधील संबंध ताणण्यामागे ‘मोबाइल’ हेच कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:09 PM2023-02-13T14:09:59+5:302023-02-13T14:10:19+5:30

संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत.

'Mobile' is the reason from straining the relationship between husband and wife to divorce | डीपी,कॉल,हार्ट एमोजीचा अर्थ काय?; नवरा-बायकोमधील संबंध ताणण्यामागे ‘मोबाइल’ हेच कारण

डीपी,कॉल,हार्ट एमोजीचा अर्थ काय?; नवरा-बायकोमधील संबंध ताणण्यामागे ‘मोबाइल’ हेच कारण

googlenewsNext

-स. सो. खंडाळकर
औरंगाबाद :
हल्ली मोबाइलवरून नवरा-बायकोंमधील संबंध टोकाला जात असून, एकमेकांना घटस्फोट देण्यापर्यंत मजल चालली आहे. शासनाच्या ‘चला बोलू या’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १५५ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली असल्याची माहिती या उपक्रमाचे विषयतज्ज्ञ प्राचार्य डॉ. अशोक वाकोडकर यांनी दिली.

नात्यातील समजूतदारपणाला प्रेरणा देणारे हे समुपदेशन केंद्र असून, ते मोफत चालवले जाते. किरकोळ कारणांनी कौटुंबिक प्रकरण न्यायप्रविष्ट होणार नाही; त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा ताण कमी होईल. पक्षकारांचा वेळेचा व पैशांचा अपव्यय टळेल. दुभंगणाऱ्या संसाराला सांधणारा दुवा म्हणून या केंद्राकडे पाहिले जात आहे. जिल्हा न्यायालय परिसरातील विधिसेवा प्राधिकरणात हे केंद्र सुरू आहे. दि. ५ ऑगस्ट २०१८ रोजी या केंद्राची स्थापना झाली. राज्यात आता अशी नऊ केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. २० ते २५ प्रकारच्या कारणांवरून निर्माण झालेल्या वादांवर या केंद्रात समुपदेशन केले जाते. सध्या मोबाइल हे कारण भांडणाचे मूळ ठरत चालले आहे.

डीपीवर फोटो का ठेवला, माहेरी फोनवर अधिक वेळ का बोलते, व्हॉटस्ॲपवर हार्ट चिन्ह आले, याचा अर्थ काय, पती घरखर्चाला पैसे देत नाही यावरून नवरा-बायकोंमध्ये नेहमीच गैरसमज होतात, वाद होतात, असे वाकोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, विवाहविषयक प्रकरणे अधिक आहेत. ती घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत जातात. पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेल व पोलिस अधीक्षकांकडून काही प्रकरणे येतात. प्रसिद्धी माध्यमातून प्रकरणे पुढे येतात. अहंकार व व्यसनाधीनतेमुळेही संबंध ताणले जातात. संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत. प्रेमविवाह हीसुद्धा मोठी अडचण ठरत आहे. जीवनशैली बदलत आहे. दोघांचीही नोकरी.... तीही बारा-बारा तासांची नोकरी करते. त्यात तासनतास प्रवास, ट्रॅफिक... या आणि अशा कारणांमुळे दोघेही वैतागतात. घरी आल्यावर उत्साह राहत नाही. परस्परांवर चिडतात. हे सर्व मुलांसमोर घडते. त्यांच्या मनांवरही विपरीत परिणाम होतो. नोकरी करणारी महिला हाऊसवाईफसारखी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. यातूनच पती-पत्नीमध्ये ताणतणाव निर्माण होतात. अशीही प्रकरणे या समुपदेशन केंद्रात येतात.

Web Title: 'Mobile' is the reason from straining the relationship between husband and wife to divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.