मोबाईल चोर पकडला

By Admin | Published: March 20, 2016 11:22 PM2016-03-20T23:22:29+5:302016-03-20T23:29:15+5:30

आखाडा बाळापूर : घरात कोणी नसल्याचे पाहून देविगल्लीतील एका घरात घुसून मोबाईल व रोख रक्कम चोरली. याप्रकरणी एका बालगुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली

The mobile thief caught | मोबाईल चोर पकडला

मोबाईल चोर पकडला

googlenewsNext

आखाडा बाळापूर : घरात कोणी नसल्याचे पाहून देविगल्लीतील एका घरात घुसून मोबाईल व रोख रक्कम चोरली. याप्रकरणी एका बालगुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त केला आहे.
आखाडा बाळापूर येथील देवीगल्ली येथे राहणारे बालाजी विश्वनाथ जंजाळ हे १८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घरातील टेबल ड्रॉव्हरमध्ये मोबाईल व रोख रक्कम ठेवून नवीन बांधकामावर पाणी देण्यासाठी गेले होते. घरातील इतर मंडळीही कामाकडे गेल्याचे पाहून कोणीतरी आयबॉल कंपनीचा मोबाईल व रोख १२ हजार रूपये चोरून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर बालाजी जंजाळ यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बीट जमादार शे. खुद्दूस यांनी चोरट्याचा माग घेतला. डोंगरकडा येथील डोंगरावरील एका मंदिराजवळ एका मुलाकडे मोबाईल असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी त्या मुलास ताब्यात घेतले. तो टाकळगाव येथील १५ वर्षीय आरोपी असून चोरलेला आयबॉल कंपनीचा मोबाईल त्यांच्याकडे आढळून आला. तो मोबाईल जप्त करून त्याची जबानी घेतली. त्याने तो मोबाईल चोरल्याचे कबूल केले. यापूर्वीही त्याने बाळापूर, वारंगा, नांदेड येथून मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला बालसुधारगृहात पाठविल्याची माहिती शे. खुद्दूस यांनी दिली. (वार्ताहर)
जुगारप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
हिंगोली : सेनगाव पोलिस ठाणे हद्दीत एलसीबीच्या पोलिसांनी शनिवारी जुगारबंदी कायद्यातंर्गत एका ठिकाणी छापा टाकला. त्यात ९७० रूपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
सेनगाव परिसरात जुगार खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने सापळा रचत कारवाई केली. यावेळी चौघेजन जुगार खेळ खेळताना आढळुन आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांचकडील रोख रक्कम ९७० रूपये व जुगारसाहित्य जप्त केले. याप्रकरणी आरोपी शेख अकबर शेख बशीर, शेख बाबू शेख बालम, अंबादास चव्हाण, ज्ञानेश्वर राठोडविरूद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात जुगारबंदी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: The mobile thief caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.