मॉडेलस्कूल रद्द, इमारतींचे काय ?
By Admin | Published: February 19, 2016 12:20 AM2016-02-19T00:20:31+5:302016-02-19T00:34:27+5:30
भोकरदन : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व मॉडेलस्कूल बंद केल्या. मात्र या मॉडेलस्कूलसाठी भोकरदन शहरात ४ कोटी २३ लाख रूपये खर्च करून इमारत
भोकरदन : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व मॉडेलस्कूल बंद केल्या. मात्र या मॉडेलस्कूलसाठी भोकरदन शहरात ४ कोटी २३ लाख रूपये खर्च करून इमारत व वसतिगृकाचे बांधकाम पूर्ण केले. शासन आता या इमारतीचा तसेच वसतिगृहाचा वापर कशासाठी करणार याचे कोडे सुट शकलेले नाही.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात मॉडल स्कूल सुरू केल्या होत्या. या शाळेसाठी कंत्राटी पध्दतीवर शिक्षकांची नेमणूक करून चार वर्षे या शाळा जिंल्हा परिषद शाळांच्या इमारतीमध्ये चालविल्या. त्यानंतर या शाळेसाठी स्वतंत्र इमारत व वसतिगृहांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर सुध्दा केला होता. त्यामध्ये राज्यात युतीची सत्ता आली, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व आ. संतोष दानवे यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील मॉडेल स्कूलच्या इमारत व वसतिगृहासाठी शहरालगतच्या जोमाळा शिवारातील गायराण जमिनीमध्ये ७ एकर क्षेत्रावर ३ कोटी ३ लाख रूपयाची शाळेची इमारत व १ कोटी २० लाख रूपयांच्या वसतिगृह इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे़ इमारतीचे बांधकाम अर्धवट झाले असतानाच शासनाने या मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला. शाळेत तीन ते चार वर्षांपासून ६ वी ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेले ११९ विद्यार्थी व विद्यार्थीनीना शहरातील न्यू हायस्कूल व शिवाजी विद्यालयात वर्ग करून जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू असलेली ही मॉडेल शाळा बंद केली होती़ मात्र इमारत व वसतिगृहाचे काम सुरू होते. त्यामुळे आता इमारतीचे बांधकाम बंद होणार की सुरूच राहणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते मात्र शासनाच्या सर्वशिक्षा अभियान अंतर्गत जिल्हापरिषदेने या बांधकामासाठी निधी उपलब्ध केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
भोकरदन येथील जिल्हा परिषदेचे उपअभियंता एम. एस़ आकोडे व कनिष्ठ अभियंता अनिल जाधव यांनी सांगितले, सदर इमारतीचे बांधकाम हे गटशिक्षण अधिकारी कार्यालया अंतर्गत येते. मात्र त्यांच्याकडे सक्षम कर्मचारी नसल्याने या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषद उपविभाग भोकरदन अंतर्गत करण्यात आले.
४या इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या इमारतीसाठी २ कोटी २० लाख रूपये तर वसतिगृहासाठी ९० लाख रूपये खर्च करण्यात आले असल्याचे आकोडे व जाधव यांनी सागितले़ एकूणच कोट्यवधी रूपये खर्च करून इमारतपूर्ण होत असली तरी या इमारतीचे करायचे काय असा प्रश्न कायम आहे.