मोदी-शहा हे तर काॅर्पोरेटजीवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:05 AM2021-03-07T04:05:51+5:302021-03-07T04:05:51+5:30

सीटू भवनात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी आरोप केला की, शेतकरी आंदोलनाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन घृणास्पद आहे. २२ ...

Modi-Shah is a corporate life | मोदी-शहा हे तर काॅर्पोरेटजीवी

मोदी-शहा हे तर काॅर्पोरेटजीवी

googlenewsNext

सीटू भवनात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी आरोप केला की, शेतकरी आंदोलनाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन घृणास्पद आहे. २२ जानेवारीनंतर सरकारने या आंदोलनासंदर्भात शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन शेतकऱ्यांचे असून, सरकारच आंदोलनाला बदनाम करीत आहे. २६ जानेवारी रोजी दिल्लीत हिंसा घडवून आणण्यामागे भाजपचाच हात होता, असा स्पष्ट आरोप ढवळे आणि डॉ. विक्रम सिंह यांनी केला. मागच्या अडीच महिन्यांपासून मी दिल्लीत आहे. शेतकऱ्यांचा निर्धार पक्का आहे. शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्याचा निर्धारही पक्का असल्याचे अशोक ढवळे यांनी स्पष्ट केले. १५ मार्चनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉ. मनोहर टाकसाळ, कॉ. पंडित मुंडे, कॉ. भाऊसाहेब झिरपे, कॉ. श्रीकांत फोपसे, कॉ. लक्ष्मण साक्रूडकर, सचिन पांडव आदींची उपस्थिती होती.

Web Title: Modi-Shah is a corporate life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.