अंगणवाडी सेविकेचा मारहाण करुन विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 19:28 IST2018-12-13T19:27:24+5:302018-12-13T19:28:07+5:30
अंगणवाडी सेविकेला मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बाबासाहेब बनकर याच्याविरुध्द गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविकेचा मारहाण करुन विनयभंग
वाळूज महानगर: वाळूज परिसरातल ४० वर्षीय अंगणवाडी सेविकेला मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बाबासाहेब बनकर याच्याविरुध्द गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज परिसरात अंगणवाडी सेविका म्हणून पीडीत महिला काम करते. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही अंगणवाडी सेविका अंगणवाडीत जात असताना तिला बाबासाहेब बनकर याने रस्त्यात अडविले. यावेळी त्याने तिच्याशी वाद घालत राजीनामा देण्यास सांगितले.
यावर तिने नकार दिला असता बाबासाहेबने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला. काही दिवसांपासून बाबासाहेब बनकर हा संबंधित महिलेची छेड काढत होता. या प्रकाराची माहिती पीडित महिलेने पती व सासूला दिली होती. सततच्या छेडछाडीला कंटाळुन पीडित अंगणवाडी सेविकेने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी बाबासाहेब बनकरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.