मुलीचा विनयभंग; सावत्र पित्यास शिक्षा
By Admin | Published: April 20, 2016 11:02 PM2016-04-20T23:02:55+5:302016-04-20T23:46:23+5:30
अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सावत्र पित्यास बाललैगिक कायद्याप्रमाणे दोषी ठरवत येथील न्यायालयाने बुधवारी पाच वर्ष सक्तमजुरी
अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सावत्र पित्यास बाललैगिक कायद्याप्रमाणे दोषी ठरवत येथील न्यायालयाने बुधवारी पाच वर्ष सक्तमजुरी व साडेतीन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
साठेनगर, अंबाजोगाई येथे हा शिक्षा झालेला पिता राहतो. पीडित मुलगी १३ वर्षीय असून, तिच्या आईने पहिल्या पतीसोबत काडीमोड घेत दुसरा विवाह केला होता. २ मार्च २०१५ रोजी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत या पित्याने सावत्र मुलीशी अश्लील चाळे केले.
याबाबत मुलीने स्वत: शहर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून त्याच्याविरूद्ध बाल लंैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद झाला. त्याला अटक करून पोलिसांनी तपास केला. येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सुनावणीसाठी जिल्हा व सत्र न्या. एस. व्ही. हांडे यांच्यासमोर आले.
सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील दिलीप चौधरी यांनी सात साक्षीदार तपासले. साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्या. हंडे यांनी या सावत्र पित्याला शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील दिलीप चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना संतोष लोमटे, अविनाश भोसले, मनीषा पवार यांनी सहकार्य केले.