छावणी परिसरात अल्पवयीन मुलीचा बापानेच केला विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:45 PM2019-05-22T23:45:22+5:302019-05-22T23:45:50+5:30
पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पतीला पत्नीने जाब विचारला म्हणून आई व मुलीला त्याने मारहाण केल्याची घटना (दि. २२ ) बुधवारी पहाटे छावणी परिसरात घडली. आईच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी त्याला अटक केली असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
औरंगाबाद : पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पतीला पत्नीने जाब विचारला म्हणून आई व मुलीला त्याने मारहाण केल्याची घटना (दि. २२ ) बुधवारी पहाटे छावणी परिसरात घडली. आईच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी त्याला अटक केली असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
बापाने बालिकेची छेड काढल्याची पूर्वीही घटना घडली होती. त्यावेळी चूक झाली, पुन्हा नाही होणार असे म्हणून त्याने माफी मागितली होती; परंतु काल तो मुलीच्या बाजूला झोपला. पहाटे दीड वाजेच्या सुमारास तो मुलीची छेडछाड करू लागला. झोपेतून उठलेली मुलगी भांबावून रडू लागली. तेव्हा शांत बस, अन्यथा तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. तो लघुशंकेसाठी दरवाजा उघडून बाहेर गेला तेव्हा मुलीने आईला उठवून घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून पत्नीने त्याला जाब विचारला असता त्याने मुलगी व पत्नीला जबर मारहाण केली. अखेर सकाळी महिलेने छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दुपारी आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीला छावणी पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे तपास करीत आहेत.