घाटीतील प्राध्यापकाचे फेसबुक अकाउंट हॅक करून मित्रांकडे पैशाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:05 AM2020-12-31T04:05:31+5:302020-12-31T04:05:31+5:30
घाटीतील प्रा. डॉ. मिर्झा शिराज बेग हे त्यांच्या नातेवाइकांच्या कार्यक्रमात असताना त्यांच्या मित्रांचे त्यांना फोन करून पैशाची गरज ...
घाटीतील प्रा. डॉ. मिर्झा शिराज बेग हे त्यांच्या नातेवाइकांच्या कार्यक्रमात असताना त्यांच्या मित्रांचे त्यांना फोन करून पैशाची गरज आहे का, असे विचारले. या प्रश्नाने अचंबित झालेल्या डॉ. बेग यांनी त्यांच्याकडे याविषयी विचारपूस केली असता त्यांच्या फेसबुक मेसेंजरवरून पैसे मागितल्याचे मेसेज प्राप्त झाल्याचे समजले. अशाच प्रकारचे मेसेज त्यांच्या अनेक मित्रांना गेल्याचे समजले. काही मित्रांनी मोबाइलवर आलेले मेसेजचे स्क्रीन शॉट पाठविले. तेव्हा आपले फेसबुक अकाउंट सायबर गुन्हेगाराने हॅक करून हा उपद्व्याप केल्याचे त्यांना समजले. सर्व मित्रांना त्यांनी फोन करून सायबर गुन्हेगारांनी त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून मेसेज पाठवल्याचे सांगितले. त्याच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका, ही विनंती मित्रांना केली. याप्रकरणी ते गुरुवारी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविणार आहेत.