दुष्काळासाठी देखरेख समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 07:41 PM2017-11-14T19:41:47+5:302017-11-14T19:41:47+5:30
नैसर्गिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळे निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्ह्यात दुष्काळ देखरेख समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नैसर्गिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळे निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्ह्यात दुष्काळ देखरेख समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविणार आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसतो. दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करताना अनेक वेळा आकडेवारीचा गोंधळ निर्माण होत असे़ अशा वेळी दुष्काळाची पारदर्शक परिस्थिती समोर येत नव्हती़ या सर्व परिस्थितीवर उपाय करण्यासाठी राज्य शासनाने आता दुष्काळ देखरेख समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे़ या समितीमध्ये विविध विभागांमधील १२ तज्ज्ञ सदस्यांचा समावेश असेल़ ही समिती प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने मूल्यांकन करणार आहे़ पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक, पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण आदी बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करीत त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे़ त्यानंतर तालुक्यात, गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे का किंवा नाही, या विषयीचे मूल्यांकन करणार आहे़ मूल्यांकनाचा हा अहवाल प्रत्येक आठवड्याला राज्यस्तरीय देखरेख समितीला सादर केला जाणार असून, या अहवालावरूनच दुष्काळाचे मूल्यमापन करून शासन उपाययोजना करणार आहे़
दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केल्यामुळे आता दुष्काळ जाहीर करण्याची परिमाने देखील बदलली आहेत़ केवळ पिकांची उत्पादकता हा एकमेव परिमाण न मानता सर्व परिस्थितीचा शास्त्रीय अभ्यास करून दुष्काळाचे मूल्यमापन केले जाणार आहे़ त्यामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचविण्यास सोयीचे होणार आहे़