घृष्णेश्वर मंदिरात वानराची शुश्रूषा, वानराच्या भांडणात जखमी झालेल्या वानरावर पुजाऱ्यांनी केले उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 09:04 PM2023-07-09T21:04:50+5:302023-07-09T21:18:42+5:30

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणावर वानराच्या टोळ्या आहेत, अनेकदा यांच्यात भांडणे होतात.

Monkey nursed in Ghrishneshwar Temple, Pujari treated monkey injured in monkey fight | घृष्णेश्वर मंदिरात वानराची शुश्रूषा, वानराच्या भांडणात जखमी झालेल्या वानरावर पुजाऱ्यांनी केले उपचार

घृष्णेश्वर मंदिरात वानराची शुश्रूषा, वानराच्या भांडणात जखमी झालेल्या वानरावर पुजाऱ्यांनी केले उपचार

googlenewsNext

 सुनील घोडके

खुलताबाद:- जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदीर परिसरात  मोठ्या प्रमाणावर वानराच्या टोळ्या असून या ठिकाणी पर्यटक व भाविक या वानरांना फळे , इतर पदार्थ खाऊ घालतात  आज रविवारी दुपारी श्री घृष्णेश्वर मंदीर परिसरात दोन वानराच्या टोळीत जोरदार भांडणे झाली या भांडणात जखमी झालेल्या वानरावर मंदीरातील पुजारी व सुरक्षा कर्मचा-यांनी प्राथमिक उपचार केले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री घृष्णेश्वर मंदीर परिसरात आज रविवारी दुपारी साडेचार वाजता दोन वानराच्या टोळीत चांगलेच युध्द झाले या युध्दात एक वानर गंभीर जखमी झाले त्याच्या हाताला मार लागल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाले त्यानंतर ते वानर थेट श्री घृष्णेश्वर मंदीराच्या गाभा-यात गेले घृष्णेश्वराच्या पिंडीवरील गुलाबाचे फुल उचलून खाल्ले व बाहेर येवून एका ठिकाणी शांतपणे बसले मंदीरातील पुजारी राजेंद्र कौशीके, संजय वैद्य, नरेश टोपरे, सुरक्षा अधिकारी  संजय कोळी यांनी या वानराजवळ जावून जखमी हातावर हळदी लावली यावेळी बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर हे जखमी वानर परिसरातील झाडावर चालले गेले.

 

 

Web Title: Monkey nursed in Ghrishneshwar Temple, Pujari treated monkey injured in monkey fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.