बनकिन्होळ्यात कुत्र्यांच्या तावडीतून वाचविले वानराचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:04 AM2021-07-26T04:04:37+5:302021-07-26T04:04:37+5:30
बनकिन्होळ्यात शनिवारी दुपारी गावामध्ये अन्नपाण्याच्या शोधात काही वानरे आली होती. गावाशेजारील नदीकाठावर बसलेल्या एका वानराच्या पिलावर काही कुत्र्यांनी अचानक ...
बनकिन्होळ्यात शनिवारी दुपारी गावामध्ये अन्नपाण्याच्या शोधात काही वानरे आली होती. गावाशेजारील नदीकाठावर बसलेल्या एका वानराच्या पिलावर काही कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. ही बाब शेजारी शेतात काम करीत असलेल्या राहुल फरकाडे या युवकाच्या निदर्शनास आली. त्यांनी कुत्र्यांना हाकलून दिले. यानंतर गावातील युवकांना फोन करून बोलावून घेतले. जखमी अवस्थेत असलेल्या वानराच्या पिलाला युवकांनी आळंद येथील दवाखान्यामध्ये नेऊन त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर गावातील ग्रामदैवत शहा कलंदर बाबा दर्गामध्ये या पिलाला सुरक्षित ठेवण्यात आले आहे. यावेळी गजानन फरकाडे, रितेश जैस्वाल, राहुल फरकाडे, अजय दामले, मयूर जाधव, नितीन जैस्वाल, कार्तिक फरकाडे, आदित्य खरात, योगेश फरकाडे यांच्यासह आदी युवक उपस्थित होते.
250721\img-20210725-wa0089.jpg
बनकिन्होळा येथे कुत्र्यांच्या हल्ल्यातून युवकांनी वाचविले माकडाचे प्राण