नाणेटंचाईमुळे व्यापाºयांचा पाच दिवस मोंढा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:09 AM2017-10-31T00:09:51+5:302017-10-31T00:09:58+5:30
शेतक-यांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : शेतकºयांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
औंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती आहे. येथे बोटावर मोजण्याऐवढेच व्यापारी व्यवसाय करतात. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे माल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांची संख्याही मोठी आहे; परंतु नोटबंदीनंतर अद्यापही व्यापारीवर्गाला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही बँक व्यापाºयांना पाहिजे तेवढा नाणेपुरवठा करीत नसल्याने पर्यायी त्यांना स्वत:चे बँकांत पैसे असतानादेखील दुसºयाकडून व्याजाने घेऊन व्यवसाय करावा लागत आहे.
या उपबाजार समितीमध्ये खरेदीदारास आर्थिक व्यवहार करणे कठीण जात असल्याने त्यांनी ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची माहिती कृषी उत्पन्न उपबाजार समितीला लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे. निवेदनावर श्रीराम राठी, जयकुमार झांजरी, भारत लापसेटवार, नागनाथ तम्मेवार, सचिन दंतलवार, संजय पाठक, मनोज देशपांडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
येथील बाजारपेठेत काही व्यापाºयांनी आॅनलाईन व्यवहार केले असले तरीही त्यातही मोठ्या अडचणी असल्याचे सांगितले जात आहे.