मान्सूनपूर्व देखभालीचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:56 PM2019-05-20T23:56:10+5:302019-05-20T23:56:50+5:30

पावसाळ्यात विजेचा लपंडाव टाळण्यासाठी महावितरणच्या सिडको उपकेंद्रातर्फे मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Monsoon maintenance work started | मान्सूनपूर्व देखभालीचे काम सुरु

मान्सूनपूर्व देखभालीचे काम सुरु

googlenewsNext

वाळूज महानगर : पावसाळ्यात विद्युत तारा तुटून तसेच डीपीत बिघाड होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे पावसाळ्यात विजेचा लपंडाव टाळण्यासाठी महावितरणच्या सिडको उपकेंद्रातर्फे मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे.


पावसाळ्यात वादळी वारा तसेच मुसळधार पावसामुळे बऱ्याचदा विजेच्या तारा, खांब तुटून पडतात. भूमिगत वाहिन्यामध्ये पाणी शिरणे, रोहित्रात तांत्रिक बिघाड होणे. तसेच झाड व झाडाच्या फांद्या विद्युत तारेवर पडल्याने वीजपुरवठा खंडित होते. तासन्तास वीज गूल होत असल्याने नागरिकांची गैरसोय होते. विजेचा लपंडाव व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात.

यामध्ये उच्चदाब व लघुदाबाच्या वाहिन्या, वीजतारा बदलणे, धोकादायक खांब सरळ करणे व बदलणे, भूमिगत केबल वायर टाकणे, लोंबकळत्या तारा ओढणे, वीज तारा जवळील तसेच तारेला स्पर्श करणाºया झाडांच्या फांद्या तोडणे, रोहित्राची देखभाल व दुरुस्ती, फ्युज, आॅईल बदलणे, बॅटरी चार्जिंग करणे, डिस्क इन्सुलेटर बदलणे तसेच विजकेंद्राची देखभाल दुरुस्ती करणे आदी देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात.


सिडको महावितरण उपकेंद्रा अंतर्गत येणाºया सिडको वाळूज महानगरासह तीसगाव, वडगाव कोल्हाटी, पंढरपूर, पाटोदा, वळदगाव, गेवराई आदी भागात जवळपास २३ हजार ग्राहक आहेत. पावसाळ्यात विजेचा लंपडाव व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सिडको महावितरण उपकेंद्रातर्फे उप अभियंता प्रशांत तोडकर, केंद्र प्रमुख सचिन उकंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची काम हाती घेतले आहे. सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, वडगाव या भागात तारा ओढणे, विद्युत तारेला अडथळा ठरणाºया झाडांच्या फांद्या छाटणी, अंतर जास्त असलेल्या ठिकाणी नवीन खांब टाकणे, केबल बदलणे, ट्रान्सफार्मरमधील किटकॅट बदलणे, एबी स्विच बसविण्याचे कामे केली जात आहेत.

Web Title: Monsoon maintenance work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.