नामविस्ताराचे स्मारक चेतना देणारे व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:05 AM2021-03-18T04:05:16+5:302021-03-18T04:05:16+5:30
शिष्टमंडळाने घेतली कुलगुरूंची भेट : व्यक्त केली कृतज्ञ भावना, अर्थसंकल्पातील तरतूद वाढवण्याची मागणी --- औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
शिष्टमंडळाने घेतली कुलगुरूंची भेट : व्यक्त केली कृतज्ञ भावना, अर्थसंकल्पातील तरतूद वाढवण्याची मागणी
---
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उभारत असलेले स्मारक नामविस्ताराच्या इतिहासाची संपूर्ण माहिती देणारे व्हावे. चेतना मिळावी म्हणून उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाला अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीत वाढ व्हावी, अशी मागणी शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे केली.
कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, प्रकाश निकाळजे, किशोर थोरात, डॉ. सचिन बोरडे, गुरमितसिंग गील, गौतम लांडगे, अमित भुईगळ, संजय ठोकळ, प्रा. सुनील मगरे, विजय सुबुकडे आदींनी कुलगुरूंची भेट घेतली. नामविस्तारासाठी शहिदांनी दिलेल्या बलिदान तसेच या लढ्याची संपूर्ण माहिती देणारे स्मारक व्हावे, अशी सर्व समाजाची इच्छा होती. त्यासाठी अनेकदा आंदोलने व निवेदने देण्यात आली. मात्र, विद्यापीठाच्या माध्यमातून कोणतीच कारवाई झालेली नव्हती. आपण सकारात्मक असा निर्णय घेतल्याने लोकांत विद्यापीठ आणि आपल्याविषयी चांगली भावना निर्माण झाली आहे. त्याचाच भाग म्हणून ही सदिच्छा भेट घेतल्याचे शिष्टमंडळाने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.