आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीचा मोर्चा

By | Published: November 26, 2020 04:13 AM2020-11-26T04:13:16+5:302020-11-26T04:13:16+5:30

ॲड. रमेशभाई खंडागळे, गाैतम खरात यांनी सांगितले की, झोपडपट्टीवासीयांना पीआर कार्ड देण्यात आलेले नाहीत. बौद्ध, दलित, अनुसूचित जाती, जमातीवरील ...

Morcha of Ambedkarite Anti-Atrocities Action Committee | आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीचा मोर्चा

आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीचा मोर्चा

googlenewsNext

ॲड. रमेशभाई खंडागळे, गाैतम खरात यांनी सांगितले की, झोपडपट्टीवासीयांना पीआर कार्ड देण्यात आलेले नाहीत. बौद्ध, दलित, अनुसूचित जाती, जमातीवरील अत्याचार वाढत असून, हल्लेखोर मोकाट फिरत आहेत. सामाजिक न्याय विभागाकडील कल्याणकारी योजनांना खीळ घातलेली आहे. आर्थिक व सामाजिक उन्नतीची दालने बंद केली जात असल्याने आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीचा मोर्चाच्या वतीने मोर्चा काढून जनतेची भावना पुन्हा एकदा सरकारच्या कानी घालण्याचा प्रयत्न आहे. केंद्र व राज्य दोन्ही सरकारे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे ॲड. खंडागळे यांनी सांगितले. क्रांतीचौकातून निघणाऱ्या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय ठोकळ, किशोर थोरात, जालिंदर शेंडगे, अरुण बोर्डे, कैलास गायकवाड, विजय मगरे, महेंद्र सोनवणे, सतीश पट्टेकर, कमलेश चांदणे, लक्ष्मण पिंपळे, आनंद लोखंडे, जगदीश कांबळे, मुकेश खोतकर, नरेश वरठे, गाैतम कारले, विलास सैादागर, प्रभाकर पारधे, नितीन दाभाडे, आनंद लोखंडे आदींनी केले आहे.

Web Title: Morcha of Ambedkarite Anti-Atrocities Action Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.