शेतकऱ्यांचा महावितरणवर मोर्चा
By Admin | Published: November 25, 2014 12:21 AM2014-11-25T00:21:50+5:302014-11-25T00:58:14+5:30
बीड : गेल्या चार दिवसांपासून जवळा, खांडेपारगांव, नागापूर, खुर्द बुद्रुक या चार गावांतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.
बीड : गेल्या चार दिवसांपासून जवळा, खांडेपारगांव, नागापूर, खुर्द बुद्रुक या चार गावांतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. कोणतीही पूर्व कल्पना न देता विद्युत पुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी येथील ग्रामीण विभाग कार्यालयावर मोर्चा काढला़
वीजबील भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला तर थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्ही.बी.गव्हाणे यांनी घेतला. वीजबील अदा करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नसल्याचेही आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
आधीच दुष्काळ, त्यत वीज गायब त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला़ महारूद्र साळुंके, विलास साळुंके यांच्यासह इतर शेतकरी महावितरणाच्या ग्रामीण कार्यालयावर धडकले़ शेतकऱ्यांचा मोर्चा कार्यालयात येताच महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली़ नंतर अधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे ऐकून घेतले़ थकबाकी असल्याने या चार गावातील सुमारे १६ रोहित्रांवरील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. वीजबील अदा न करणाऱ्याच शेतीपंपधारकांवरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. याची अंमलबजावणी करीत थकीतदारांचाच वीजपुरवठा त्वरीत बंद करण्याचे आदेश महावितरणने दिले़ (प्रतिनिधी)