योजना कर्मचा-यांचा औरंगाबाद येथे मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:41 AM2018-01-18T00:41:27+5:302018-01-18T00:41:34+5:30
योजना कर्मचा-यांनी किमान वेतनासह विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा, या व इतर मागण्यांसाठी बुधवारी क्रांतीचौक ते जिल्हा परिषदेमार्गे विभागीय आयुक्तालयापर्यंत मोर्चा काढला होता. मनपा, जि.प., विभागीय आयुक्तांसह, नगर परिषद मुख्याधिका-यांना मागण्यांचे निवेदन सीटूमार्फत देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : योजना कर्मचा-यांनी किमान वेतनासह विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा, या व इतर मागण्यांसाठी बुधवारी क्रांतीचौक ते जिल्हा परिषदेमार्गे विभागीय आयुक्तालयापर्यंत मोर्चा काढला होता. मनपा, जि.प., विभागीय आयुक्तांसह, नगर परिषद मुख्याधिका-यांना मागण्यांचे निवेदन सीटूमार्फत देण्यात आले.
जिल्ह्यातील सुमारे २० हजार कर्मचारी विविध योजनांतर्गत काम करतात. त्यातील बहुतांश आशा वर्कर्स, गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार, अंगणवाडी, ग्रामरोजगार, सेवकांसह शिक्षण व आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. अॅड. उद्धव भवलकर, लक्ष्मण साकु्रडकर, दामोदर मानकापे, मंगल ठोंबरे, पुष्पा पैठणे, पुष्पा शिरसाट, वैशाली अभ्यंकर, संगीता जोशी यांच्यासह शेकडो महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडीसह महिला कर्मचाºयांना किमान १८ हजार वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधी, आशा व गटप्रवर्तकांना मोबाईल, डिलेव्हरी, प्रवास व इतर भत्त्यात वाढ करावी. इतर कामांचा बोजा त्यांच्यावर टाकू नये. अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, शालेय पोषण कर्मचारी होते.