औरंगाबादेत सोमवारी आणखी लस येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:02 AM2021-01-25T04:02:16+5:302021-01-25T04:02:16+5:30
ग्रामीण भागातील केंद्र बदलण्याची मागणी औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचार्यांसाठी वैजापूर, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय, पाचोड, अजिंठा ग्रामीण ...
ग्रामीण भागातील केंद्र बदलण्याची मागणी
औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचार्यांसाठी वैजापूर, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय, पाचोड, अजिंठा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. परंतु ही चार केंद्रे गाठण्यासाठी अन्य तालुक्यातील कर्मचार्यांना गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी केंद्र करण्याची मागणी होत आहे.
कोकणवाडी चौकात धोकादायक खड्डा
औरंगाबाद : कोकणवाडी चौकात ऐन रस्त्याच्या मधोमध धोकादायक असा खड्डा पडला आहे. चौकातून ये-जा करताना या खड्ड्यात वाहने आदळण्याचा प्रकार होत आहे. रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसून येत नाही. त्यामुळे अपघाताचाही धोका वाढत आहे. त्यामुळे मनपाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अपहार प्रकरणात आता जिल्ह्यातच बदली
औरंगाबाद : एसटी महामंडळाने अपहार प्रकरणात होणार्या बदली धोरणात बदल केला आहे. यापूर्वी अपहार प्रकरणातील वाहकांची जिल्ह्याबाहेर, इतर विभागात बदली केली जात असे. आता विभागातच म्हणजे जिल्ह्यातील आगारांतच बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे अपहारप्रकरणी शिक्षेव्यतिरिक्त जिल्ह्याबाहेर बदली होणार नाही.