औरंगाबादेत सकाळी बैठक, सायंकाळी कारवाईचे नाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:38 AM2018-04-25T00:38:14+5:302018-04-25T00:38:48+5:30
शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडीचालक, फेरीवाल्यांचा भयंकर त्रास वाढला असून, आम्हाला दुकानांचे शटरही उघडणे अवघड झाले आहे. रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणा-या मंडळींवर कठोर कारवाई करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आज त्रस्त व्यापाºयांनी महापालिकेला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडीचालक, फेरीवाल्यांचा भयंकर त्रास वाढला असून, आम्हाला दुकानांचे शटरही उघडणे अवघड झाले आहे. रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणा-या मंडळींवर कठोर कारवाई करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आज त्रस्त व्यापाºयांनी महापालिकेला दिला. व्यापा-यांचे हे रौद्र रूप पाहून महापालिका प्रशासन त्वरित कामालाही लागले. सायंकाळी पाच वाजेपासून शहागंज परिसरापासून हातगाड्या, अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू करण्यात आली. कारवाईच्या दुसºयाच दिवशी चित्र जशास तसे पाहायला मिळते, हे विशेष.
शहागंज, सिटीचौक, रंगारगल्ली, गुलमंडी, टिळकपथ, गोमटेश मार्केट, औरंगपुरा, कुंभारवाडा, चेलीपुरा, पैठणगेट आदी भागांत सर्वाधिक हातगाड्या आहेत. प्रत्येक दुकानासमोर एक तर हातगाडी हमखास असतेच; कितीही हाकलून लावल्यानंतर हातगाडीचालक परत येऊन उभे राहतात. त्यांच्यामुळे आम्हाला व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. जुन्या शहरातील रस्ते रुंद केले. या रुंद रस्त्यांवर हातगाडीचालक आणि फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. महापालिका या संकटातून व्यापाºयांना बाहेर काढणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू,असा इशाराही व्यापाºयांनी मनपाला दिला. सकाळीच व्यापाºयांचे शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झाले. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी केले. यावेळी नगरसेविका यशश्री बाखरिया, शिल्पाराणी वाडकर, नासेर सिद्दीकी, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, हेमंत कदम यांच्यासह उपायुक्त रवींद्र निकम उपस्थित होते. शहागंज ते सिटीचौकपर्यंत एकही हातगाडी दिसता कामा नये, असे आदेश महापौरांनी यावेळी .
एमआयएमचे राजकारण
शहागंज चमनमध्ये जवळपास १०० टपºया आहेत. या टप-यांचीही लीज संपली आहे. या टप-या काढण्याचे आदेश मालमत्ता विभागाला देण्यात आले होते.
मालमत्ता अधिकारी वामन कांबळे यांनी सर्व टपरीधारकांना सामान रिकामे करा, असे आदेश दिले. त्याच वेळी विरोधी पक्षनेते फेरोज खान तेथे पोहोचले. त्यांनी एकही टपरी काढू देणार नाही, अशी भूमिका घेतली. शहागंजमधील सर्व दुकानांची पार्किंग गायब आहे.
अगोदर ही पार्किंग शोधा असे त्यांनी नमूद करीत कारवाईला वेगळे वळण दिले. मनपाने टपरीधारकांकडून २०१८ मध्ये भाडे भरून घेतले. न्यायालयाचा आदेश आहे, अशी भूमिकाही टपरीचालकांनी मांडली.
शहागंजपासून कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सायंकाळी ५ वाजेपासून शहागंज परिसरापासूनच कारवाईला सुरुवात केली. शहागंज चमनजवळ किमान १५० पेक्षा अधिक हातगाड्या होत्या. मनपाचे पथक पाहून सर्व हातगाड्या क्षणार्धात पसार झाल्या. एकही हातगाडी मनपा पथकाच्या हाती लागली नाही. अतिक्रमण हटाव पथकाने सिटीचौकपर्यंत कारवाई केली. सिटीचौकात रात्री कारवाईला पूर्णविराम देण्यात आला.