सर्वात महागडे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:44 PM2017-09-03T23:44:17+5:302017-09-03T23:44:17+5:30

राज्यातील कोणत्याच महापालिकेत किंवा नगर परिषदेत पाणीपट्टीसाठी ४ हजार रुपये वसूल करण्यात येत नाहीत. औरंगाबाद महापालिका याला अपवाद असून, राज्यात सर्वात महाग पाणी शहरात नागरिकांना देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 The most expensive water | सर्वात महागडे पाणी

सर्वात महागडे पाणी

googlenewsNext

मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यातील कोणत्याच महापालिकेत किंवा नगर परिषदेत पाणीपट्टीसाठी ४ हजार रुपये वसूल करण्यात येत नाहीत. औरंगाबाद महापालिका याला अपवाद असून, राज्यात सर्वात महाग पाणी शहरात नागरिकांना देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांकडून चार हजार रुपये वसूल करूनही मनपा फक्त ९० दिवसच पाणी देते, हे विशेष. १ एप्रिल २०१८ पासून पाणीपट्टीत आणखी दहा टक्केवाढ होणार म्हणजे औरंगाबादकरांना दरवर्षी ४५०० रुपये पाणीपट्टीपोटी मोजावे लागणार आहेत.
नाशिक येथील गंगापूर, दारणा आदी धरणांमधून जायकवाडीत दरवर्षी पाणी येते. यंदाही नाशिकमधून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जायकवाडी धरण ८० टक्केभरले आहे. औरंगाबाद महापालिका जायकवाडीचेच पाणी नागरिकांना देते. नाशिक शहरात दररोज पाणीपुरवठा होतो. घरगुती नळधारकांकडून नाशिक मनपा १ हजार लिटर पाण्यापोटी फक्त ५ रुपये घेते. वाणिज्य वापरासाठी २५ रुपये दर आकारण्यात येतो. १९९२ पासून आजपर्यंत महापालिकेने पाणीपट्टीत वाढ केली नाही. दरवर्षी पाणीपुरवठ्याचा खर्च ३७ कोटी रुपये आहे. वसुली ४० कोटी रुपये होते. यामध्ये ४० टक्के पाण्याची गळती गृहीत धरलेली आहे. नाशिक शहराला दररोज ४०० एमएलडी पाणीपुरवठा होतो

Web Title:  The most expensive water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.